Numerology: मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, ‘या’ जन्मतारखा ‘मिस्टर कूल’ म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र


Numerology: ते म्हणतात ना, माणसावर संकट काही सांगून येत नाही, आणि कोणालाही त्या संकटाची चाहूल मिळत नाही, ज्यासाठी कोणीही या परिस्थितीवर मात करण्यासाठी आधी तयार राहत नाही, अशी काही परिस्थिती आली, तर लोक घाबरतात, त्यांना कळत नाही काय करावं ते..पण काही लोक असे असतात. ज्यांच्यावर मोठ्यातली मोठी परिस्थिती आली तरी ते घाबरत नाही, डगमगत नाही, अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांचे मन शांत राहते, अशा लोकांना खरं तर मिस्टर कूल म्हणून ओळखले जाते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारीख किंवा मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, जो महेंद्रसिंग धोनीचा देखील मूलांक आहे. हे लोक कठीण काळातही शांत राहतात. त्यांचे मन नेहमी शांत असते. लोक त्यांना ‘मिस्टर कूल’ म्हणतात.

अशा लोकांना ‘मिस्टर कूल’ म्हटले जाते…(Numerology)

अंकशास्त्रानुसार, विशिष्ट अंक असलेल्या लोकांचे मन अगदी थंड असते. असे लोक अत्यंत कठीण काळातही नियंत्रण गमावत नाहीत. यामुळेच ते परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळतात. हे लोक आपला राग नियंत्रित करण्यात पारंगत असतात. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याची त्यांची क्षमता हे त्यांचे एक सामर्थ्य आहे. अशा लोकांना ‘मिस्टर कूल’ म्हटले जाते. ते स्वभावाने अनेकदा शांत असतात.

कठीण काळातही शांत राहतात…

अंकशास्त्रामध्ये, जन्मतारखेवरून मूळ अंक काढला जातो. तो व्यक्तीचा स्वभाव दर्शवतो. आज आपण अशा जन्मतारखांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा जन्म 7, 16, 25 तारखांना झाला असेल, या लोकांचा मूलांक 7 असतो. महेंद्रसिंग धोनीसारख्या लोकांचा हा मूलांक असतो. ते कठीण काळातही शांत राहतात. त्यांचे मन नेहमी शांत असते. लोक त्यांना ‘मिस्टर कूल’ म्हणतात.

केतू ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव..

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हे लोक खोलवर विचार करणारे असतात. त्यांना सहजासहजी राग येत नाही. जेव्हा एखादी समस्या समोर येते, तेव्हा ते आधी विचार करतात आणि मग कृती करतात. या व्यक्तींवर केतू ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव असतो. ते खोलवर विचार करणारे असतात. त्यांना सहजासहजी राग येत नाही. जेव्हा एखादी समस्या समोर येते, तेव्हा ते आधी विचार करतात आणि मग कृती करतात.

धोनीचाही हाच मूलांक

अंकशास्त्रानुसार, महेंद्रसिंह धोनीचा जन्म 7 जुलै रोजी झाला. त्याचा मूलांक 7 आहे. तो क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या षटकातही शांतपणे परिस्थिती हाताळतो. तो शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकतो. त्याचे शांत मनच त्याला ‘मिस्टर कूल’ बनवते.

ते घाईने निर्णय घेत नाहीत…

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक कोणाच्याही दबावाखाली राहत नाहीत. त्यांचे मन स्पष्ट राहते आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात. नोकरी असो, कुटुंब असो किंवा एखादी मोठी समस्या असो, ते शांत राहतात आणि त्यावर उपाय शोधतात. हे लोक चांगले नेते, शास्त्रज्ञ, लेखक किंवा सल्लागार बनू शकतात. ते घाईने निर्णय घेत नाहीत, म्हणूनच त्यांचे काम अनेकदा यशस्वी ठरते.

नात्यांमध्ये प्रामाणिक असतात..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांना कधीकधी एकटेपणा जाणवतो. त्यांनी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे. जास्त विचार केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून व्यायाम आणि ध्यान करणे चांगले आहे. ते पैसे जपून खर्च करतात. ते नात्यांमध्ये प्रामाणिक असतात, पण आपल्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत.

हेही वाचा :

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे ‘असे’ दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *