Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप…’


अमरावती : अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरीप्रकरणी शिवसेना ठाकरे पक्ष (Shivsena UBT) आक्रमक झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज रामरक्षा आंदोलनाची (Ram Mandir donation) हाक देण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षातील आमदारांनाही मतदारसंघात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेण्याचं सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंनी स्वत: दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन केले होते. आज, 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्व तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात (Ram Mandir donation) आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अयोध्येच्या राममंदिर दान विरोधात रामरक्षा पठण (Ram Mandir donation) आंदोलन ठेवण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर मंदिर परिसरात शिवसेना ठाकरेंच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या, मंदिराला फुलांनी सजवण्यात आले, याप्रकरणी जैन मुनी निलेशचंद्र (Jain Muni Nilesh Chandra) यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

Jain Muni Nilesh Chandra : मी पाहिलं त्यांना धड वाचता देखील आलं नाही…

जैन मुनी निलेशचंद्र यांनी अमरावतीमध्ये एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे संपलेले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यकता होती, तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंचं आंदोलन मी पाहिलं त्यांना धड वाचता देखील आलं नाही. उद्धव ठाकरेंना कुराण द्यायला पाहिजे होतं, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही. त्यांना श्राप लागलेला आहे. त्यांना शुद्धीकरण करण्याची गरज आहे. राम आमच्या आस्थेचं केंद्र आहे. आता जी बाबरी मस्जिद बनत आहे, तिथे देखील घोटाळा झाला आहे, त्याच्या विरोधात करणार नाही का तुम्ही काही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Jain Muni Nilesh Chandra :तुम्ही आधी कुराण वाचा, कुराणची तुम्हाला गरज आहे….

पुढे बोलताना मुनी निलेशचंद्र म्हणाले की, राम मंदिरात जी चोरी झाली त्याचं आम्ही बघून घेऊ. आमची दानपेटी आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचं बघा, रामाला धन आणि वैभवाची गरज नाही. ज्या वेळेस राम मंदिर बनत होते त्यावेळेस तुम्ही आंदोलन का नाही केलं? हे फक्त हिंदुत्वाला दाबायला तयार आहेत, देवा भाऊंची ही सरकार आहे आणि देवा भाऊ आता महाराष्ट्रातले राम आहेत. उद्धव साहेबांना माझं म्हणणं आहे. तुम्ही आधी कुराण वाचा, कुराणची तुम्हाला गरज आहे. राम रक्षा कवच तुमच्यासाठी नाही, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

 Shivsena UBT: आज नागपुरात आंदोलन; होर्डिंगही लागले

नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अयोध्येच्या राममंदिर दान विरोधात रामरक्षा पठण आंदोलन ठेवण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर मंदिर परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने होर्डिंग लावण्यात आले, त्यावरती रामद्रोह, हिंदुद्रोह, म्हणजे देशद्रोह या आशयाचे होर्डिंग शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून लावण्यात आले. मंदिर परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या, मंदिराला फुलांनी सजवण्यात आले आहे.  

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *