तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानला जीवे मारण्याची धमकी; ‘भाईजान’च्या शत्रूच्या निशाण्यावर आता ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Aamir Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या गँगच्या नावानेच आमिर खानलाही सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18

अभिनेता आमिर खानने तिसरं लग्न केलं आणि त्याच्यासमोर सतत काही ना काही अडचणी येत आहेत. त्याच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटलं गेलं. धार्मिक संघटनांनी तर याला विरोध केलाच पण आता त्याला गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ असल्याचा दावा केला जातो आहे. यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा शत्रूच आमिर खानच्याही मागे लागल्याचं सांगितलं जातं आहे. भाईजानला धमकी देणाऱ्या गँगच्या नावानेच आमिर खानलाही सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या दाव्यामुळे मनोरंजन विश्व आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये आणि कथित ऑडिओ क्लिपमध्ये, ‘टायसन बिश्नोई’ नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, आमिर खान आता त्याचं लक्ष्य आहे. या पोस्टमध्ये आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला असून, टोळीने त्याला लक्ष्य करण्यामागे हेच कारण असल्याचं म्हटलं आहे. ही पोस्ट आणि त्यासोबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“जय श्री राम, जय सीता राम. मी, आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई गँग). आमिर खानसारखे लोक जे आपल्या देशात ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली आपल्या संस्कृतीच्या विरोधातील गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत. आम्ही त्यांना सहन करणार नाही, लवकरच त्यांना सडेतोड उत्तर देऊ. ही गोष्ट आपल्या सनातन धर्माच्या आणि देशाच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. जे स्टारडमच्या नावाखाली या गोष्टीला प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा आम्ही श्वास दाबून टाकू.”

आमिर खानकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

या व्हायरल पोस्ट आणि कथित ऑडिओसंदर्भात आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. संबंधित तपास यंत्रणा किंवा पोलिसांनीही या दाव्याची पुष्टी किंवा खंडन केलेलं नाही.

हे संवेदनशील प्रकरण लक्षात घेता, मुंबई पोलीस आणि सायबर सेलच्या पथकांना सक्रिय करण्यात आले असून, ते या सोशल मीडिया अकाऊंट आणि ऑडिओच्या सत्यतेची चौकशी करत आहेत.

दरम्यान न्यूज18मराठी या व्हायरल सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करू शकत नाही.

मराठी बातम्या/मनोरंजन/

तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानला जीवे मारण्याची धमकी; ‘भाईजान’च्या शत्रूच्या निशाण्यावर आता ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *