Nashik: ‘शीट, मागची काच पण फोडली’ ते टाटा सफारीमध्ये अन् दोघे जण बाईकवरून फेकत होते रॉड, नाशिकचा बिहार झाल्याचा भयानक VIDEO | नाशिक बातम्या (Nashik News)


Last Updated:

लोखंडी रॉडने हल्ला करून समोरील काच फोडली, मागील काचही फोडली. यामध्ये गाडीत बसलेल्या महिलांना दुखापत झाली.  घाबरलेल्या अवस्थेत  या कुटुंबाने कशीबशी आपली सुटका करून घेतली

News18
News18

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवर या टवाळखोरांनी जवळपास १० ते १५ किमी पाठलाग करून एसयूव्हीवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने भीषण हल्ला केला. यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात राहणाऱ्या पुनम भागवत ही महिल्या आपल्या कुटुंबीयांसह रविवारी भावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते.  धरणाच्या परिसरात फिरत असताना भागवत कुटुंबातील एका तरुणीची काही टवाळखोरांनी छेड काढली. त्यावरून भागवत कुटुंबीय आणि या टवाळखोरांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या टवाळखोरांनी भागवत कुटुंबांवर हल्ला केला. त्यामुळे हे कुटुंब आपल्या टाटा सफारी एसयूव्हीमधून घटनास्थळावरून निघून गेले,

पण, या टवाळखोरांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला. हातात लाकडी दांडे आणि लोखंडी रोडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करून समोरील काच फोडली, मागील काचही फोडली. यामध्ये गाडीत बसलेल्या महिलांना दुखापत झाली.  घाबरलेल्या अवस्थेत  या कुटुंबाने कशीबशी आपली सुटका करून घेतली. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  हल्ला होताच भागवत यांनी गाडी पळवल्याने जीव वाचल्याचा दावा केला आहे.   हल्लेखोरांनी दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले केले, असा आरोप भागवत कुटुंबीयांनी केला.

या प्रकरणी  भागवत कुटुंबाने नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.  अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *