Vijay Vadettivar on maratha reservation gr: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर, जितेंद्र खापरे : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, सरकार झुकण्यास तयार नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “ओबीसींचा मोर्चा निघून दोन आठवडे उलटले तरी राज्य सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सरकारमधील काही चेले-चपाटे ओबीसींचे नुकसान होत नाही, असे सांगत आहेत; मात्र प्रत्यक्षात २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होत आहे,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, “मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय हा मराठवाड्यापुरता मर्यादित असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या निर्णयानुसार मिळणारे प्रमाणपत्र हे फक्त चार जिल्ह्यांपुरते मर्यादित नसून संपूर्ण देशभर वैध राहते. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे.” Beed News: ‘मला पक्षाची सत्ता आणायची आहे, मी जरांगे पाटील यांच्या…’; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “बावनकुळे हे स्वतः ओबीसी समाजातून आलेले नेते आहेत. ओबीसींमुळेच त्यांना आज राजकीय पद मिळाले आहे. भाजपने एकेकाळी त्यांना अडगळीत टाकले होते. आता पुन्हा पद मिळाल्याने त्यांनी खुर्चीसाठी वाहत जाऊ नये. समाजाच्या हितासाठी त्यांनी ठाम भूमिका घ्यावी.” असेही वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी मोर्चानंतरही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी नागपुरात विदर्भातील आणि राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. “या बैठकीत शासन निर्णय रद्द करण्यासाठी कोणती रणनीती आखावी, पुढील आंदोलनाची रूपरेषा काय असावी, यावर सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर आमची पुढील भूमिका सार्वजनिक केली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.
बीडमधील आरोपी शिक्षक संदीप क्षीरसागरांचा राईट हँड; बजरंग सोनवणेंचं धनंजय मुंडेंना उत्तर
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, “आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही. मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, पण ते ओबीसींच्या वाट्यातून नको. आमच्या समाजाचा अधिकार कुणी हिरावून घेऊ नये.” राज्य सरकारने तात्काळ जीआर रद्द करून ओबीसींच्या आरक्षणावरील संभ्रम दूर करावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाची चेतावणीही वडेट्टीवार यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा