England vs Australia : आवाज कातरला, कंठ दाटला अन् डोळ्यात पाणी; वर्ल्ड कप फायनल हरल्यावर रोहित शर्मासारखी ढसाढसा रडली इंग्लंडची कॅप्टन! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

England Skipper Emotional After Loss Final : इंग्लंड क्रिकेट संघाची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण स्पर्धेत संघाने अप्रतिम कामगिरी केली होती.

England Skipper Emotional After Loss Final
England Skipper Emotional After Loss Final

England captain Emotional In Post Match Presentation : वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवली गेली होती. टीम इंडिया पहिल्याच ग्रुप स्टेजमध्ये स्पर्धेतून बाहेर झाली होती. अशातच फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत सातव्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. तर इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या पराभवानंतर खेळाडू भाविनक झाले अन् मैदानातच खेळाडू रडकुंडीला आल्या होत्या. तर पोस्ट मॅचमध्ये बोलताना इंग्लंडची कॅप्टन ऑन कॅमेरा रडली.

फायनलमधील पराभवानंतर तीव्र नाराजी

इंग्लंड क्रिकेट संघाची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण स्पर्धेत संघाने अप्रतिम कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे खूप वाईट वाटत असल्याचे तिनं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी संघाने आजच्या मोठ्या मॅचमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. यावेळी इंग्लंडच्या सपोर्टवर बोलत असताना तिला भावना अनावर झाल्या अन् तिचा कंठ दाटून आला.

ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा सिद्ध केलं

मोठ्या मॅचमध्ये खेळाचा दर्जा कसा उंचावायचा, हे ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या पराभवातून धडा घेऊन इंग्लंड संघ आगामी काळात आणखी मजबूत पुनरागमन करेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. या पराभवाने जरी निराशा झाली असली, तरी ऑस्ट्रेलियन संघाच्या अनुभवाचे तिनं मनापासून कौतुक केलं आहे.

बेथ मुनीची खेळी मॅचमध्ये निर्णायक

इंग्लंडच्या बॉलिंग इनिंगबद्दल बोलताना सायव्हर-ब्रंटने मान्य केलंय की, त्यांना विकेट्स मिळवण्यात खूप उशीर झाला. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त विकेट्स घेण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरला होता, परंतु ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्यांना यश मिळू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हिने खेळलेली खेळी या मॅचमध्ये निर्णायक ठरली, असेही तिने सांगितले.

कदाचित निकाल वेगळा लागला असता – इंग्लंडची कॅप्टन 

टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, असेही तिने नमूद केले. फलंदाजी करताना अनेक खेळाडू चाचपडत होते आणि बॉल बॅटच्या मध्यभागी नीट येत नव्हता. जेव्हा सामन्यात दबाव वाढतो, तेव्हा मोठी टीम कशी कामगिरी करते, याचे उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलियाने त्यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीतून दाखवून दिलं, असंही इंग्लंडची कॅप्टन म्हणाली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

England vs Australia : आवाज कातरला, कंठ दाटला अन् डोळ्यात पाणी; वर्ल्ड कप फायनल हरल्यावर रोहित शर्मासारखी ढसाढसा रडली इंग्लंडची कॅप्टन!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *