Pune Moshi Building Collapse: मंत्री आले, आमदार आले, महापौर आले. त्यानंतर आम्हाला कोणीही स्टेटमेंट दिलं नाही. अपघाताची जबाबदारी घेणार नक्की कोण? अक्षय गायकवाड पंधरा दिवसापूर्वी कामाला लागला होता. नुकतंच त्याचं लग्न झालंय. अक्षयला लहान लहान मुल आहेत. आम्हाला उत्तर द्यायला कोण पुढे येत नाही. जबाबदार अधिकारी का उत्तर देत नाहीत. आम्ही कोणाकडे जायचं? अशी प्रश्नांची सरबत्ती लावत मोशी दुर्घटनेतील(Pune Moshi Building Collapse) कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
Moshi Building Collapse: अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव, नातेवाईकांच्या प्रश्नांची सरबत्ती!
पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेला (Pune Moshi Building Collapse) तीन दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरूच असल्याचं चित्र आहे. मात्र इमारतीचा ढाचा कधीही ढासळू शकतो, अशी स्थिती निर्माण झालेली असतानादेखील जवानांनी खबरदारी घेत शोधकार्य सुरू ठेवलं आहे. अजूनही आठ कामगार अडकल्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. 15 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही 8 जण स्लॅब खालीच अडकल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा आता कडेलोट झाला असून रात्री उशिरा त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घालत काही प्रश्न विचारलेत. आम्हाला उत्तर पाहिजे. दगा फटका झाला तर त्याचीही भरपाई पाहिजे. अशी मागणी या नातेवाईकांनी केली आहे.
Moshi Building Collapse: घटना घडण्याच्या दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिली, उपाययोजना का केली नाही?
तुम्ही आमच्याबरोबर चला, आमच्या नातेवाईकांना दिलासा द्या. या इमारतीला भेगा पडल्या होत्या. आम्ही ते फोटो घटना घडण्याच्या आधी दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या होत्या. त्यावर का उपाययोजना करण्यात आल्या नाही. आज ज्या पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे, त्या पद्धतीने दोन दिवस काम झालं नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. कचऱ्याचा ढीग किती उंचीपर्यंत असावा, याची काही एसओपी असेल ना? चुकीचं कोणी उल्लंघन करत असेल तर त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मागणी ही नातेवाईकांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ