Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे झालेल्या दुर्घटनेचं (Moshi Building Collapse) शोधकार्य अजूनही सुरूच आहे. 67 तास उलटले तरी शोधकार्य संपलेलं नाही. आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिटचा भाग तोडण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एस्कव्हेटर मशीन आणलंय. या मशीनद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीत सुरक्षित प्रवेश करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर वापर करण्यात येत आहे. मशीनच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय. आता पहिल्या मजल्यावरील स्लॅबचं पाडकाम सुरू आहे. या स्लॅबखालीच अडकलेले आठ कामगार असण्याची शक्यता आहे. आज हे शोधकार्य संपेल अशी अपेक्षा आहे.
मोशी दुर्घटनेच्या इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय, याचा धक्कादायक खुलासा एबीपी माझाने केल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशींना (Vijay Suryavanshi) याबद्दल विचारलं असता. आपण दावा फोल ठरल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं आयुक्तांचे भाषेत संताप जाणवला. मी आधीचं तुम्हाला याप्रकरणाची चौकशी करतो असं म्हटलंय. त्यामुळं पहिला आणि दुसरा मजल्याला पूर्णत्वाचा दाखला होता की नाही? हे चौकशीत समोर येईल. असं म्हणत विजय सूर्यवंशींनी बोलणं टाळलं. (Pune Moshi Building Collapse)
मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले- (Moshi Building Collapse)
मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले. रात्री उशिरा त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घालत काही प्रश्न विचारले. आम्हाला उत्तर पाहिजे…दगा फटका झाला तर त्याचीही भरपाई पाहिजे…मंत्री आले, आमदार आले, महापौर आले, त्यानंतर आम्हाला कोणीही स्टेटमेंट दिलं नाही. याची जबाबदारी घेणार नक्की कोण? पंधरा दिवसापूर्वी कामाला लागला होता नुकतंच त्याचं लग्न झालंय. अक्षय गायकवाडला लहान लहान मुलं आहेत. आम्हाला उत्तर द्यायला कोण पुढे येत नाही. जबाबदार अधिकारी का उत्तर देत नाहीत. आम्ही कोणाकडे जायचं. तुम्ही आमच्याबरोबर चला आमच्या नातेवाईकांना दिलासा द्या, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नेमकं काय घडलं? (Pune Moshi Building Collapse)
पुण्यातील मोशी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. मोशीतील ही दुर्घटना बुधवार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडली. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा प्रचंड ढिगारा घसरून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले आणि त्यानंतर NDRF, अग्निशमन दल व इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळून अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला अनेक जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही कर्मचारी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून विषारी वायू, अस्थिर इमारत आणि सततचा पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
संबंधित बातमी:
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ