जून महिन्यात ठाकरे गटाला मोठा हादरा बसला होता. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात एंट्री केली. या ‘ऑपरेशन टायगर’मुळे फक्त मबाराष्ट्रातच नव्हे देशाच्या राजकारणातही मोठी खळबळ नमाजील. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, तर 6 खासदार पक्षात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली. याच ऑपरेशन टायगर संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेन केलेल्या या ‘ऑपरेशन टायगर’चे काही फोटो समोर आले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे फुटीर खासदारांचे फोटो आता समोर आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हेही दिसत असून या ऑपरेशनच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदे हेच होते, अशीही महत्वाची माहिती समोर आली आहे.
श्रीकांत शिंदे व प्रताप सरनाईक, हेच पाच खासदारांना ओम बिर्ला यांच्याकडे घेऊन गेले होते. त्यानंतर श्रीकांत शिंदे हे चार्टर्ड फ्लाईटनेआष्ट ओमराजे निंबाळकर यांनाही घेऊन आले , अशी माहिती आता उघड झाली आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत फुटीर खासदारांचा फोटो आता समोर आला असून पडद्यामागचा चेहरा कोण, हेही आता समोर आलं आहे.
लीड रोलमध्ये होते श्रीकात शिंदे
18 जून रोजीचा हा फोटो असल्याचं बोललं जात आहे. ऑपरेशन टायगर अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आलं होतं. या ऑपरेशनच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदे हेच होते, असंही आता समोर आलं असून पडद्यामागचा चेहरा त्यांचाच असल्याचंही या फोटोच्या माध्यमातून उघड झालं आहे. ठाकरे गटातील 5 फुटीर खासदारांना श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक, हे दोघे ओम बिर्ला यांच्याकडे घेऊन गेले होते, हेही या फोटोतून स्पष्ट होतंय. त्यानंतर श्रीकांत शिंदेनी चार्टर्ड फ्लाईटने ओमराजे निंबाळकर यांनाही आणलं, अशीसुद्धा माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
फुटीर खासदारांचा फोटो समोर
संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, हे पाचही फुटीर खासदार जे ठाकरेंच्या पक्षात होते, ते सर्व या फोटोत दिसत आहेत. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हे मात्र तेव्हा नव्हते. त्यासाठी श्रीकांत शिंदे हे चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीहून नांदेडला गेले आणि तिथून ते ओमराजे निंबाळकर यांना घेऊन पुन्हा दिल्लीला परतले. त्यानंतर 6 जणांचा कोरम पूर्ण झाला. मग त्यांनी ओम बिर्ला यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र त्या भेटीचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.