MI vs RR : मुंबईने शेवटची मॅचही गमावली, कॅप्टन हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं परभवाचं खापर? राजस्थानचा एक बॉलर पलटणला पुरून उरला


MI vs RR Match Turnign Point : आयपीएलमध्ये पार पडलेल्या मुंबई आणि राजस्थानच्या सामन्यात पलटणचा ३० धावांनी पराभव झाला. शेवटच्या सामन्यातही मुंबईला विजय मिळवता आला नाही. कॅप्टन हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं असून सामना कुठे गेला हे सांगितलं आहे.

Hardik Pandya
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर राजस्थान संघाने ३० धावांनी मात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान संघाने २०५-८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला राजस्थानच्या गोलंदाजांनी १७५-९ धावांवर रोखले. मुंबई शेवटच्या सामन्यात गोड शेवट करेल असे सर्वांना वाटले होते. परंतु राजस्थानने मुसंडी घेत विजय तर मिळवलाच पण पॉइंट टेबलमधील आपले चौथ स्थान भक्कम केले. सामना संपल्यावर कॅप्टन हार्दिक पंड्या याने सामन्याचा टर्निंग पॉइंट सांगितला.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

मला वाटतं आम्ही १० ते १५ धावा अधिक दिल्या. खूप गरम होत होतं, मात्र तरीही गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली होती. पॉवर प्लेमध्ये आम्ही जास्त विकेट गमावल्या आणि त्यामुळे सामन्यामध्ये मागे पडलो. जेव्हा मी बॅटिंगला गेलेलो तेव्हा बॉल बरोबर बॅटवर येत होता. दोन्ही डावांमध्ये पिच बॅटिंगसाठी चांगले होते. फक्त योग्य मैदानावर टिकून राहत क्रिकेटिंग फटते खेळायचे होत. डेथ ओव्हर्समध्ये खेळणं अवघड असतं. मला विश्वास आहे की जर त्या पाच ओव्हरमध्ये १ किंवा २ चौकार जरी मारले तरीसुद्धा समोरच्या संघ १२ ते १५ धावांनी कमी पडतो. पण आम्ही ते करू शकलो नाही. कारण शेवटच्या ५ ओव्हरमध्ये ७३ धावा केल्या त्यामुळेच सामना गमावला, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
Maharashtra TimesMI vs RR : मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी दारूण पराभव, राजस्थानची प्ले ऑफमध्ये थाटात एन्ट्री; पंजाब-केकेआर बाहेर
या सामन्यामध्ये राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबईच्या संघाला पुरून उरला. पठ्ठ्याने फक्त बॉलिंगच नाहीतर बॅटिंदमध्येही आपले योगदान दिले. आपल्या स्पेलमध्ये आर्चरने ४ ओव्हर टाकताना १७ धावा देत ३ विकेट घेतल्या. यामध्ये रोहित शर्मा, नमन धीर आणि हार्दिक पंड्या यांच्या विकेट घेतल्या. त्यासोबतच १५ बॉलमध्ये ३१ धावांची आक्रमक खेळी केली आहे. यामध्ये त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारला. आर्चरच्या या प्रदर्शनाने मुंबई बॅकफूटवर गेली होती.
Maharashtra TimesSara Tendulkar : लाखात एक नणंद! साराच्या पोस्टमध्ये युजरने सानिया वहिनीला वगळल्याने तिचा एकच शब्दात कडक रिप्लाय, लाईक्सचा पडला पाऊस
दरम्यान, मुंबईचा मुख्य फलंदाज असलेला रोहित शर्मा याने सपशेल नांगी टाकली. शून्य धावांवर तो आऊट झाला. त्यापाठोपाठ नमन धीरही आऊट झाला. यंदा नमन याने बॅटिंगची जबाबदारी पार पाडली होती. रिकल्टनही मोक्याच्यावेळी आऊट झाला. त्यामुळे मुंबईची प्रमुख फळी लवकर गेल्याने काही अंतराने विकेट पडत गेल्या आणि त्यांचा पराभव झाला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा