Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला…


Diljit Dosanjh on CJP Student Protest Shares Post:  नुकतंच ‘सतलज’ या सिनेमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे.  कालपासून जंतर – मंतरवर विद्यार्थ्यांनी ठिय्या (Entertainment) मांडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर फूटी प्रकरण  आणि शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराविरोधात देशातील युवकांनी आवाज उठवला आहे (Cockroach Janta Party). दिग्गज नेत्यांसह सिनेकलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.  काल आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याच लाठीचार्ज विरोधात दिलजीतने संताप व्यक्त केला.   ‘विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारे वागण्यात आले आहे, ते योग्य नाही’, असं त्याने म्हटलं आहे.  

‘कॉकरोच जनता पार्टी’साठी दिलजीत दोसांझची खास पोस्ट (Diljit Dosanjh reacts to student protest)

 20 जुलै रोजी जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने संसद भवनाबाहेर मोर्चा काढला. यावेळी लाखोच्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.  विद्यार्थी आणि आंदोलकांवर  लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फेकण्यात आल्या. या झटापटीत काही आंदोलक आणि विद्यार्थी जखमी झाले.    या घटनेचा अनेक सिनेकलाकारांनी निषेध व्यक्त केला.  प्रकाश राज, शबाना आझमी, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर आणि विशाल ददलानी यांसारख्या कलाकारांनी या  घटनेचा निषेध केला.  

दिलजीत दोसांझनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, ‘आज जे काही झालं ते खूप भयंकर होतं.  विद्यार्थ्यांना अशी वागणूक द्यायला नको हवी होती. मी  प्रशासनाला विनंती करतो की, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा. जनतेचा आवाज हा देवाचा आवाज असतो’, असं दिलजीत दोसांझ म्हणाला. यानंतर दिलजीतने 2020च्या किसान आंदोलनाची आठवण काढली. जेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.  त्याला ‘देशद्रोही’ ठरवण्यात आलं होतं. 

त्याने पुढे पोस्टमध्ये म्हटलं की, ‘माझ्यावर बऱ्याचदा देशद्रोहीचा टॅग लावण्यात आला आहे.  आता देखील मला देशद्रोही म्हटले जाईल.  शेतकरी आंदोलनानंतर मला खूप त्रास सहन करावा लागला होता.   कायदेशीर कारवाईचा त्रास सोसावा लागला, याबद्दल मी कुणाला फार सांगूही शकत नाही.  बाकी सगळं देव बघत आहे’, असंही दिलजीत दोसांझ म्हणाला. माहितीनुसार, 2020 साली शेतकरी आंदोलनात  दिलजीत   त्यांच्या समर्थनात मैदानात उतरला होता.  त्याने तेव्हा सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांची आर्थिक मदत केली. त्यांना 1 कोटी रुपये दान केले.  तसेच केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास विनंती केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *