Bhojpuri Actor Rohit Sharma Death: भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने उडवलं, प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; शूटिंगवरून परत येताना भीषण अपघात


Bhojpuri Actor Rohit Sharma Death:  मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शर्माला (Actor Rohit Sharma Death) जोरदार धडक दिली. या अपघातात अभिनेत्याचा मृत्यू झालाय. 20 जुलै रोजी संध्याकाळी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलेला अभिनेता रोहित शर्मा 21 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास  परतत होता.त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली.ही धडक एवढी जोरात होती की अभिनेता रोहितचे हेल्मेट फुटले व त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

नेमकं घडलं काय?

अभिनेत्याचा भाऊ मंजेश यांनी दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार,’ अभिनेता रोहित शर्मा सोमवारी संध्याकाळी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उत्तर प्रदेशातील मलिहाबादला गेला होता. त्याचा मित्रही त्याच्यासोबत होता.मात्र मंगळवारी पहाटे बाईकवरून परत येत असताना,रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की अभिनेता रोहित शर्माचे हेल्मेट फुटले व त्याच्या पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रोहित आणि त्याच्या मित्राला गंभीर अवस्थेत राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान अभिनेता रोहित शर्माचा मृत्यू झाला होता.त्याच्या मित्रावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ट्रकचा नंबर ओळखण्यात यश मिळाले आहे. चालकाला लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.मंगळवारी रात्री उशिरा अभिनेता रोहित शर्माच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून अभिनेता रोहित शर्माच्या मृत्यूने भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसलाय. या अभिनेत्याने अनेक भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *