Manoj Jarange: ना फॅन, ना मंडप, ना पाणी! मी आता थेट….,मनोज जरांगेंनी घेतला टोकाचा निर्णय | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

विशेष म्हणजे, यंदाचे उपोषण हे नेहमीसारखे सावलीत किंवा फॅनखाली नसणार आहे. मे महिन्याच्या या रखरखत्या आणि कडक उन्हात, डोक्यावर छत्र न घेता, पायात चप्पल न घालता आणि अन्न-पाण्याचा एक थेंबही न घेता ते हे ऐतिहासिक उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला असून अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याचे जाहीर करत, त्यांनी आगामी 30 मे पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.

“आतापर्यंत सरकारला गरजेपेक्षा जास्त वेळ दिला, 29 मे रोजी या आंदोलनाला तब्बल १० महिने पूर्ण होत आहेत; पण सरकारने फक्त आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. आता एकदाचा आरपारचा लढा होईल, एकतर सरकारचा तुकडा पडेल किंवा माझ्या जीवाचा!” अशा अत्यंत तीव्र शब्दांत जरांगे पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे, यंदाचे उपोषण हे नेहमीसारखे सावलीत किंवा फॅनखाली नसणार आहे. मे महिन्याच्या या रखरखत्या आणि कडक उन्हात, डोक्यावर छत्र न घेता, पायात चप्पल न घालता आणि अन्न-पाण्याचा एक थेंबही न घेता ते हे ऐतिहासिक उपोषण करणार आहेत.

“माझ्या शरीरात आधीच प्रचंड वेदना आहेत, या कडक उन्हात माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाले किंवा उष्माघाताने बळी गेला, तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हे उपोषण अत्यंत टोकाचे असल्याने मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर हालचाली वाढल्या असून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “तुम्हाला मराठ्यांची मते चालतात, मग आरक्षण द्यायला दुटप्पी भूमिका का? ओबीसींनी न्याय मागून मंत्रालय स्थापन केले,

मग मराठे आणि कुणबी एक असूनही जीआर का काढला जात नाही? ५८ लाख नोंदी सापडूनही व्हॅलिडेशनचे काय झाले आणि सातारा गॅझेट का लागू केले जात नाही?” असे एकामागून एक बोचरे सवाल करत त्यांनी थेट सरकारला कोंडीत पकडले आहे. जरांगे यांच्या या वज्रनिर्धारामुळे राज्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

1967 पासून पन्नास वर्षात आमचं वाटोळं सरकारने का केलं? आमचा बॅकलॉक कोण भरून काढणार? मला आता आर पारचं खेटायचं आहे. असचं मी एखाद्या रानात ऊन्हात बसणार आहे. आता एकदाचेच होऊन जाऊ द्या. माझा नाईलाज आहे मला ही भूमिका घ्यावी लागली. अंतरवालीतच हे उपोषण होणार. लावा लावी सोडून तुम्ही दुसरं काहीच केलं नाही. फोन करून काय करता रिझल्ट काय देणार तुम्ही? इतकं क्रुर सरकार जगात कधी आलं नसेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही का मराठ्यांकडे आहे म्हणून त्यांना आरक्षणाची गरज नाही का? तुम्हाला जर खेटायचच असेल तर 30 तारखेपासून खेटू.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *