बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक


मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना घडली आहे. बांधकाम इमारतीवरुन पडून एका कामगाराचा आज संध्याकाळी 4 वाजता दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सत्ताधारी पक्षाचे खासदार रवींद्र वायकर आक्रमक झाले आहेत. विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करा; अन्यथा प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करण्याचा इशारा वायकरांनी दिला आहे. 

कल्पतरू विकासकाच्या प्रकल्पास्थळी घडली घटना

मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी पूर्व श्याम नगर तलाव परिसरात सुरू असलेल्या कल्पतरू विकासकाच्या प्रकल्पास्थळी पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू. आज संध्याकाळी 4च्या सुमारास घटना घडली आहे. जोगेश्वरीत सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांमध्ये विकासकाच्या हलगर्जीपणामुळे 5 ते 6 कामगार तर स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरीत घडत असलेल्या मृत्यूच्या मालिकामुळे खासदार रवींद्र वायकर आक्रमक झाले आहेत. रहिवाशी आणि कामगाराचा जीव महत्वाचा आहे. विकासक सुरक्षेचे नियम पाळत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप खासदार रवींद्र वायकर यांनी केलाय. 

संबंधित विकासक आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

कल्पतरू विकासकाच्या प्रकल्पास्थळी पडून 25 वर्षीय कामगार समीर नाहक याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तात्काळ कामगाराला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूप्रकरणी खासदार रवींद्र वायकर आक्रमक झालेत. महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना मुंबईत घडत आहेत. त्यामुळे संबंधित विकासक आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असी मागणी वायकरांनी केलीय पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन घेण्याचा इशारा वायकरांनी दिला आहे. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *