Nanded Politics : हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या ‘त्या’ गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?


नांदेड : राज्याच्या राजकारणात विधानपरिषदेच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. अशातच नेत्यांच्या मंत्र्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी नांदेड येथे भेट घेतली. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड येथे मध्यरात्री भेट घेतली. हॉटेलमध्ये दोघांची एक तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.(Nanded Politics)

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, मध्यरात्री नांदेडमध्ये एक गुप्त राजकीय बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट नांदेड दौऱ्यावर असलेले कल्याण-डोंबिवलीचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची मध्यरात्री एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. सध्या महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची जागावाटपावरून आणि आगामी गणितांवरून जोरदार खलबतं सुरू आहेत. अशातच चिखलीकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात झालेल्या या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आगामी काळात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी महापालिकेचा निवडणुकीत जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा प्रयोग झाला होता, तोच प्रयोग आता या विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा पाहायला मिळणार का ? असा मोठा प्रश्न आता नांदेडकरांना पडला आहे.

Nanded Politics :  पक्षाने जर सांगितले तर लढणार नाही तर….

पक्षाने जर सांगितलं तर लढणार नाही तर सर्वांसोबत चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या संदर्भात चिखलीकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझं प्रवीण सोबत काही बोलणं झालेलं नाहीये. मी त्याच्यासोबत चर्चा करेल राष्ट्रवादीला ही जागा मी माझ्या मुलासाठी मागत नाहीये, तर जागा मी माझ्या पक्षासाठी मागत आहे. पक्ष वाढीसाठी काम करत आहे. म्हणून जागा मागत आहे. तसेही जागा भाजपला जाणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भेटल्याचं चिखलीकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणे माझे काम आहे, देवगिरी निवासस्थानी जी बैठक झाली, त्या बैठकीला मी स्वतः होतो. पक्ष कसा मोठा झाला पाहिजे या संदर्भात तिथे चर्चा झाली. कालच्या बैठकीमध्ये तटकरे यांना आमच्या बद्दलचे गैरसमज झालेले होते त्याबद्दल त्यांनी खुलासा केला, राष्ट्रीवादीमध्ये कुठला वाद नसल्याचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *