Maharashtra Teacher Recruitment: 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली भरती प्रक्रियेत (Teacher Recruitment In Maharashtra) पवित्र पोर्टल वरून उमेदवारांना पसंती क्रमांक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पवित्र पोर्टल वर पसंती क्रमांक नोंदवताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषयात व पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
काही ठिकाणी पोर्टलवर माहिती व्यवस्थित प्रदर्शित होत नसल्याचा समोर येतंय. तर पवित्र पोर्टलवर पसंतीक्रमासाठी अर्ज भरत असताना पवित्र पोर्टल साइटवर लोड जास्त असल्याने ओटीपी प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पसंती नोंदवण्यासाठी 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट एवढाच वेळ शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता मात्र यामध्ये आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत 13 ऑगस्टपर्यंत हा वेळ देण्यात आला आहे. मात्र दोन दिवस वाढवून नाही तर एक आठवडा मुदत वाढवून द्यावी अशी मागणी उमेदवार आणि शिक्षक संघटनांची आहे.
तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं शिक्षण विभागाकडून मान्य- (Maharashtra Teacher Recruitment)
पवित्र पोर्टल वर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं शिक्षण विभागाकडून मान्य करण्यात आलं असून ओटीपी उपलब्ध होण्यासाठी नेमकं काय करायला हवं, त्याच्या सूचना पत्रात देण्यात आले आहेत. शिवाय आतापर्यंत 76394 मुलाखतीशिवाय व 56206 मुलाखतीसह उमेदवारांचे आतापर्यंत प्राधान्यक्रम जनरेट झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून पत्रकात देण्यात आली आहे.
नेमकं पत्रकात तांत्रिक अडचणी संदर्भात काय म्हटला आहे? (Maharashtra Teacher Recruitment)
1. संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 11/08/2026 ऐवजी 13/08/2026 अशी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांनी सदर वाढलेली मुदत लक्षात घेऊन प्राधान्यक्रम लॉक करावेत.
2. पोर्टलवर उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी अथवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी Otp आवश्यक आहे, यासाठी Otp वर क्लीक केल्यानंतर Otp लगेच येतो परंतु मोट्या प्रमाणात उमेदवार लॉगिन करत असल्याने Otp लगेच येत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे Otp न आल्यास काही काळ otp येण्यास वाट पाहावी, लगेच Resend यावर क्लीक करू नये. Otp उशिराने आला तरी Otp स्वीकारण्यात येतो त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नाही. काही काळापर्यंत Otp न आल्यास पुन्हा Otp बटन समोरील Resend वर क्लीक करून Otp मिळवता येईल.
3. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या Browser ची History / Cache clear करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास Incognito Window (Private Window) चा वापर करावा.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी: