Kolhapur: भाजपच्या कार्यकर्त्यावर भर दिवसा गोळीबार, कोल्हापूर हादरलं | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

कोल्हापुरात शहरामध्ये भर दिवसा ही घटना घडली आहे.  सुरज साखरे असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुरज साखरे  हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील एका भाजपच्या कार्यकर्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले आहे. जखमी अवस्थेत कार्यकर्त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कोल्हापुरात शहरामध्ये भर दिवसा ही घटना घडली आहे.  सुरज साखरे असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुरज साखरे  हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सुरज साखरे हा एक खासगी सावकार म्हणून काम करतोय. त्याच्या गटातील काही जणांनी आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे.

सुरज साखरे याच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाावरून फरार झाले. हल्लेखोरांचीच ओळख अजून पटलेली नाही. सुरज साखरे याला तातडीने  खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *