Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय? – Marathi News | Ketan Agarwal Murder case Siya goyal and Chetan Chaudhari full proof plan at lohgad fort Pune Lonavala what Ketan Father Anil Agrawal claim


Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलच्या चेहऱ्यावरून ती इतकी क्रूर असेल असे वाटत नाही. तिचा यापूर्वीचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नाही अथवा ती कोणत्याही वेगळ्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आलेले नाही. पण तिने ज्याप्रकारे केतन अग्रवाल याचा खून केला, त्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. कोणत्याही प्रकारे आणि लवकरात लवकर तिला केतनचा काटा काढायचा होता. यासाठी तिने होणाऱ्या नवऱ्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत खोल ढकलून खून केला. पण दरीत धक्का देण्यापूर्वी सियाने ते क्रूर कृत्य केले… काय केले होते सियाने?

अगोदर डोक्यावर वार… मग 400 फूट खोल दरीत फेकले

लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवाल, सिया गोयल हे त्यांच्या मित्रासह पोहचले. त्यांच्यासोबत चेतन चौधरी हा ही किल्ल्यावर होता. संधी साधून सिया गोयल केतनला घेऊन एका निर्जन स्थळाकडे घेऊन आली. तिथून खाली खोल दरी होती. तिथे तिने केतनला बोलण्यात गुंतवले आणि कोणत्या तरी जड वस्तूने तिने केतनच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या जबरदस्त माऱ्याने आणि अचानक हल्ल्याने केतन गोंधळलेला असतानाच सिया गोयलने त्याला जोराचा धक्का दिला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत पडला, याविषयीची माहिती केतनचे वडील अनिल अग्रवाल यांनी दिली. कोणालाही शंका येऊ नये यासाठीच आरोपी चेतन चौधरी हा दुचाकीवर लोहगड किल्ल्याजवळ आल्याचे ते म्हणाले. कदाचित जर हा हल्ला केतनला चुकवता आला असता तर धडपड करून तो वाचला असता असेही अग्रवाल कुटुंबाला वाटते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सियाला मुलाशी लग्न करायचे नव्हते. तर तिने अगोदरच सांगायचे होते, आम्ही लागलीच हा संबंध तोडला असता, मुलाला इतक्या निर्घृणपणे मारले, अशी क्रूर मानसिकता येते कुठून? हा तिच्या संस्काराचा भाग आहे का, असा संतप्त सवाल अनिल अग्रवाल यांनी केला.

साखरपुड्यानंतर मृत्यूचे काऊंटडाऊन

पोलिसांचा आरोप आहे की, साखरपुड्यानंतर सिया आणि चेतन सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी मिळून केतनचा खून करण्याची योजना आखली. त्यानंतर सियाने केतनचा पासपोर्ट लपवाल. त्याच्या मागे बाली येथील त्यांचे प्री वेडिंड शूट ट्रिप रद्द केली. त्यानंतर केतनला मारण्याचा तीनदा प्रयत्न फसला. त्यानंतर आरोपी वारंवार लोहगड किल्ल्यावर गेले आणि केतनला कुठे मारायचे याचे ठिकाण त्यांनी निश्चित केले. 19 जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवसापूर्वी 18 जून रोजी ट्रेकिंगच्या बहाण्याने त्याचा खून केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *