पुणे: पुण्यातील चर्चेत असलेली केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. केतनच्या खुनाचा कट रचताना आरोपींनी केवळ प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीच केली नाही, तर यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा (Ketan Agrawal Case Crime news) आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही त्यांनी सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, केतनच्या मृत्यूनंतर (Ketan Agrawal Case Crime news) कुटुंबीयांसमोर दुःख कसे व्यक्त करायचे, सर्वात जास्त दुःखी कसं दिसायचं, याबाबत सिया गोयलने चॅटजीपीटीवर माहिती शोधल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.(Ketan Agrawal Case Crime news)
पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. घटनची माहिती मिळताच सियाचे आणि केतनचे कुटुंबीय लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले. त्यावेळी सियाने अपेक्षित पद्धतीने दुःख व्यक्त केले नसल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यानंतर घरी गेल्यावर सियाने दुःख कसे व्यक्त करावे, तसेच अधिक दुःखी भावना कशा दाखवाव्यात, याबाबत ऑनलाइन सर्च केल्याचे डिजिटल पुराव्यांच्या तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअपवर शेअर केलेली माहिती तसेच डिजिटल उपकरणांमधील इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले असून ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.(Ketan Agrawal Case Crime news)
Ketan Agrawal Case Crime news: ‘मशरूम’मधून विषप्रयोग करण्याचाही शोध घेतला पण…
सियाने केतनला ठार करण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतल्याचेही पोलिसांना तपासात समोर आले आहे. यामध्ये अन्नपदार्थातून विषप्रयोग करण्याच्या शक्यतेचाही समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘Mushroom use woman kill family by mushroom’, ‘Is it easy to kill someone’ तसेच ‘How to manipulate people’ अशा स्वरूपाचे सर्च केल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे मशरूम किंवा अन्नपदार्थाच्या माध्यमातून केतनला संपवण्याचा स्वतंत्र प्रयत्न अथवा कट होता का, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मात्र, या इंटरनेटवरती शोधलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष खुनाच्या कटाशी नेमका संबंध काय, याचा अंतिम निर्णय न्यायालयीन पुरावे आणि सुनावणीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.(Ketan Agrawal Case Crime news)
केतनच्या खुनानंतर आपण आखलेल्या कटामुळे पोलिसांच्या तावडीत कधीच सापडणार नाही, असा विश्वास आरोपींना सुरुवातीला होता. मात्र, जसजसा वेळ गेला तशी आरोपी चेतनला पकडले जाण्याची भीती वाटू लागली. अशा कठीण प्रसंगी सियाने त्याला धीर दिला. पुढे जेव्हा सियाचाही आत्मविश्वास डळमळू लागला, तेव्हा चेतनने तिला सावरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती लागल्यास चौकशीदरम्यान कसे वागायचे, प्रश्नांची काय उत्तरे द्यायची आणि न घाबरता परिस्थिती कशी हाताळायची, याबाबत आरोपी रितेशच्या सल्ल्याने ऑनलाइन सर्चिंग करण्यात आले होते. त्यामुळेच अटकेनंतरही सर्व आरोपी अत्यंत शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
Ketan Agrawal Case Crime news: ‘राजा रघुवंशी’ हत्याकांडाचा सखोल अभ्यास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा कट रचत असताना आरोपींनी सुरुवातीला सोनम रघुवंशी हिने घडवून आणलेल्या गाजलेल्या ‘राजा रघुवंशी’ हत्याकांडाचा सखोल अभ्यास केला. त्या गुन्ह्यात आरोपींकडून कोणत्या चुका झाल्या आणि ते कसे पकडले गेले, याची माहिती त्यांनी गोळा केली. त्यानंतर आरोपींनी लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या अपघाती मृत्यूंच्या जुन्या घटना शोधण्यास सुरुवात केली. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर या तरुणीचा दरीत पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेची सविस्तर माहिती त्यांनी मिळवली. सिया, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांनी ही सर्व माहिती सोशल मीडिया व मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी शेअर केल्याचे निष्पन्न झाले आहे.