India’s Got latent 2 Marathi Boy Viral Video: तमाम वाद विवादानंतर, समय रैना पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ (Indias Got Letent 2) शोचा दुसरा सीजन घेऊन प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या सीजनमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोचा पहिला भाग प्रचंड अडचणीत आला होता. देशभरातून या शोवर प्रचंड टीका करण्यात आली होती. आता त्याच्या नव्या शोमधील अनेक व्हिडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या क्लिप्समध्ये लक्ष वेधून घेतलंय, एका मराठी मुलाने. ‘इंडियाज गॉट लेटंट’चा हा शो या मराठी अभिनेत्याने अक्षरशः गाजवला. पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याची एक्टिंग एवढी कमाल होती, की खुद्द समय रैनाही निःशब्द झाला. सगळ्यांनी भरभरून कौतुक केल्यानंतर हा अभिनेता भावनिक झाला होता. सध्या त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ दुसऱ्या सीजनमध्ये आलेल्या एका मराठी तरुणाच्या अभिनयामुळे सगळेच चाट पडले. या तरुणाला सगळ्यांनी 10 पैकी 10 मार्क दिले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दारुड्या माणसाचा रोल त्याने एवढा पकडला होता, त्याने तो शेवटपर्यंत सोडला नाही. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना असं वाटलं की, तो खरोखर दारू पिऊन आलाय. तिथे असलेल्या सगळ्यांना त्याने प्रचंड हसवलं. अनेकांना रोस्ट केलं. पण, तो इतका दारुड्याचा रोलमध्ये गेला होता, की शेवटी सगळ्यांनी तुझा खरा आवाज काढून दाखव असं सांगितलं. जेव्हा त्याने खरा आवाज काढून दाखवला तेव्हा आलिया भट, शर्वरी, समय रहना व संपूर्ण पॅनलसह उपस्थितही उठून उभे राहिले. त्याला प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी दाद दिली. हे सगळं पाहिल्यानंतर, हा अभिनेता प्रचंड भावनिक झाला होता. त्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हा मराठी अभिनेता नेमका कोण?
‘इंडियाज गॉट लेटंट’ मध्ये अक्षरशः सगळ्यांना स्वतःच्या अभिनयाने निशब्द करणारा हा अभिनेता मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. या अभिनेत्याचं नाव सुकृत देव असं असून त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केली आहेत. लेखक दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार यांच्या ‘यदाकदाचीत रिटर्न्स ‘ या नाटकामध्ये ही त्याची महत्त्वाची भूमिका आहे.सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेला सुकृत अनेक विनोदी रील्स शेअर करत असतो. तसेच त्याने किस्मत आणि मुहूर्त या चित्रपटांमध्ये ही काम केली आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष