India-China : रुपयाच्या गडगडण्यामुळे भारत संकटात पण चीन आनंदात, आपल्या या स्थितीचा ड्रॅगन असा उचलतोय फायदा – Marathi News | Indian rupee falling not only against dollar Chinese yuan currency too import bill hike inflation export down


पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारताचं चलन रुपया फक्त डॉलर समोरच कोसळत नाहीय, तर चिनी करन्सी युआन समोरही रुपयाची घसरण सुरु आहे. ही घसरण लोकांना एका मोठ्या संकटाकडे घेऊन जात आहे. कारण चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंचे दर वाढत चालले आहेत. आपण कितीही ठरवलं, तरी चीनकडून आयात बंद करु शकत नाही. त्यामुळे महागाईचा धोका वाढत चालला आहे. त्याचवेळी चीनला याचा फायदा होत आहे. एक्सपर्ट्सच्या मते, ज्या प्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण चिंतेची बाब आहे. तसच चीनच्या करन्सीच्या तुलनेत घसरण भारतासाठी अडचणीची बाब आहे. यामुळे चीन मधून भारतात येणाऱ्या सामानाच्या किंमती वाढू शकतात. भारत अब्जावधी डॉलर्सचं सामान चीनकडून आयात करतो. त्या तुलनेत निर्यात खूप कमी आहे. अशावेळी रुपयाची घसरण ही चिंताजनक बाब आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत रुपया युआनच्या तुलनेत 6 ते 8 टक्क्याने पडला आहे. जानेवारी महिन्यात 1 युआनच्या तुलनेत रुपया ₹12.8-13 होता. पण आता घसरणीनंतर 1 चिनी करन्सीच्या तुलनेत रुपया ₹14-14.2 झाला आहे. म्हणजे भारताला आता चीनकडून सामान विकत घेण्यासाठी 8 ते 10 टक्के जास्त रक्कम अदा करावी लागेल. त्यामुळे चिनी वस्तुंची खरेदी महाग होणार आहे.

चीनकडून किती अब्ज डॉलर्सची आयात?

वर्ष 2024 चे आकडे पाहिले तर भारताने चीनकडून मोठ्या प्रमाणात सामानाची आयात केली. 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आयात केली. तेच वर्ष 2025 मध्ये व्यापाराचा आकडा वाढून 155 अब्ज डॉलर झाला. यात एकूण आयातीचा आकडा 115 ते 120 अब्ज डॉलर होता. चीनमधून होणाऱ्या आयातीचे आकडे पाहिले तर 2025 च्या तुलनेत आयात जास्त होण्याचा अंदाज आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स, सोलर इक्विपमेंट आणि मशिनरीची आयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशीच आयात सुरु राहिली तर 2026 मध्ये चिनी सामानाची आयात 125 ते 135 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

भारत चीनला कुठल्या सामानाची निर्यात करतो?

समजा 2025 या वर्षात चिनी आयात जवळपास 120 अब्ज डॉलरची होती आणि युआनच्या तुलनेत रुपया 7 टक्के कमजोर झाला, तर भारतावर 8.4 अब्ज डॉलरच अतिरिक्त ओझं वाढणार. रुपयामध्ये हे समजून घ्यायचं झाल्यास 70 हजार ते 75 हजार कोटी रुपये जास्त लागतील. आर्थिक वर्ष 2025 चे आकडे बघितले तर भारताने चीनला 14.5 अब्ज डॉलरचं सामान निर्यात केलय. आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने चीनला पेट्रोलियम प्रोडक्‍ट्स, आयरन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि अन्य सामानाची निर्यात केली. भारत चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे भारताचं व्यापारी नुकसान सुद्धा वाढलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *