IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीतImage Credit source: BCCI
Prasidh Krishna 20 Consecutive Dot Balls: भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यात सावध सुरूवात केली. पावरप्लेच्या 10 षटकात एकही गडी न गमावता 58 धावा केल्या. इतकंच काय तर बेन डकेट आणि जेकेब बेथेल यांनी भारतीय गोलंदाजांनी विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. तसेच ही भागीदारी 150 धावांच्या पार गेली. इंग्लंडने चांगली सुरूवात केली आणि मजबूत स्थितीत आहे. पण या सामन्याच्या सुरूवातील भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीची धुरा सांभाळली.
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडविरुद्ध पावर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याला विकेट मिळाली नाही, पण 5 षटकात 4.20 च्या इकोनॉमी रेटने 21 धावा दिल्या. पण त्याच्या गोलंदाजीवर धावा काढताना इंग्लंडच्या फलंदाजांना सुरूवातीला खूपच कठीण गेलं. असं करताना असताना मॉर्डन क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णाने एक कारनामा केला. या स्पेलमध्ये त्याने दोन षटकं निर्धाव टाकली. प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजीचा नजराणा सादर करत सलग दोन षटकं निर्धाव टाकली. प्रसिद्ध कृष्णाने सलग 20 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केला. मॉर्डन क्रिकेटमध्ये सलग 20 चेंडू निर्धाव टाकणं मोठी गोष्ट आहे. कारण फलंदाज प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना अडचणीत आणणं मोठी बाब आहे.
प्रसिद्ध कृष्णाचा 20 निर्धाव चेंडूंचा स्पेल
प्रसिद्ध कृष्णा वैयक्तिक पहिलं आणि टीम इंडियाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी आला. या षटकात प्रसिद्ध कृष्णाने 12 धावा दिल्या. त्यानंतर शुबमन गिलने त्याच्याकडे संघाचं चौथं आणि त्याचं वैयक्तिक दुसरं षटक सोपवलं. या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आला. मात्र त्यानंतर सलग पाच चेंडू निर्धाव टाकले. संघाचं सहावं आणि वैयक्तिक तिसरं षटक त्याने निर्धाव टाकलं. आठव्या वैयक्तिक चौथ्या षटकातही त्याने हीच कामगिरी केली. सलग दोन षटकं निर्धाव टाकली. त्यानंतर संघाचं दहावं आणि वैयक्तिक पाचवं षटक टाकत असताना तीन चेंडू निर्धाव टाकले. त्यामुळे सलग 20 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केला.