Last Updated:
Spain Won FIFA World Cup 2026 Final : चार मिडल फिल्डरसोबत खेळणाऱ्या स्पेनने आपलं जाळं एवढं स्ट्रॉग विनलं होतं की, अर्जेंटिनाच्या प्लेयर्सला आणि मेस्सीला बॉल पास करण शक्यच झालं नाही.
Spain Won FIFA World Cup 2026 vs Argentina : अख्ख्या जगाला वेड लावणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या विजेता संघ घोषित झाला आहे. तुम्ही सगळे साखर झोपेत असताना युरोपियन चॅम्पियन असणाऱ्या स्पेनने डिफेन्डिंग चॅम्पियन अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करत 16 वर्षांनंतर वर्ल्ड कपवर नाव रचलं आहे. एक्स्ट्रा टाईममध्ये 106 व्या मिनिटाला फेरान टोरेसने एक अप्रतिम गोल करत स्पेनला 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर अर्जेंटिनाने अप्रतिम अटॅक केला पण त्यांना शेवटपर्यंत गोल करता आला नाही. पण मार्टिनेझ भिंतीसारखा उभा असताना मेस्सीच्या तोंडातून स्पेनने वर्ल्ड कप कसा हिसकावला? जाणून घ्या.
स्पेनच्या मिडफिलर्सने मेस्सीला संधीच दिली नाही
मॅचच्या पहिल्या बॉलपासून स्पेनच्या खेळाडूंनी मॅचवर वर्चस्व निर्माण केलं. स्पेनने संपूर्ण सामन्यात बॉलवर नियंत्रण ठेवत अर्जेंटिनाला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. स्पॅनिश संघाने तब्बल 68 टक्के बॉलवरील ताबा राखला, तर अर्जेंटिनाकडे केवळ 32 टक्के पझेशन होते. यावरून स्पेनने खेळाची गती आणि दिशा दोन्ही नियंत्रित केल्याचे दिसून आलं. पहिल्या काही मिनिटापासूनच स्पेनने अर्टेंजिनावर अटॅक केला अन् स्पेनच्या मिडफिलर्सने मेस्सीला एकही शॉट मारण्याची संधी दिली नाही.
स्पेनचा वारंवार गोलपोस्टवर मारा
चार मिडल फिल्डरसोबत खेळणाऱ्या स्पेनने आपलं जाळं एवढं स्ट्रॉग विनलं होतं की, अर्जेंटिनाच्या प्लेयर्सला आणि मेस्सीला बॉल पास करण शक्यच झालं नाही. संपूर्ण 90 मिनिटाच्या गेममध्ये एकदाही असं झालं नाही की, अर्जेंटिनाने गोलपोस्टवर अटॅक केला असावा, पण स्पेनच्या मिडफिल्डर्सने वारंवार गोलपोस्टवर मारा केला अन् अखेर त्यांना 106 व्या मिनिटाला यश आलं.
स्पेनचे 11 शॉट्स ऑन टार्गेट
आक्रमणातही स्पेन अर्जेंटिनापेक्षा कितीतरी सरस ठरला. स्पेनने एकूण 20 शॉट मारले, तर अर्जेंटिनाला केवळ 3 शॉट्स घेता आले. विशेष म्हणजे अर्जेंटिनाला संपूर्ण 120 मिनिटांत एकही फटका गोलपोस्टच्या चौकटीत मारता आला नाही. उलट स्पेनचे 11 शॉट्स ऑन टार्गेट होते. त्यामुळे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेझला वारंवार बचाव करावा लागला.
अर्जेटिना 10 खेळाडूंसह मैदानात
स्पॅनिश खेळाडूंनी 803 पासेस पूर्ण केले, तर अर्जेंटिनाने 445 पासेस केले. स्पेनचा पासिंग अचूकतेचा दर 90 टक्के इतका प्रभावी होता, तर अर्जेंटिनाचा हा आकडा 78 टक्के राहिला. शिस्तीच्या बाबतीत मात्र स्पेनचा वरचष्मा होता. स्पेनला संपूर्ण सामन्यात एकही यलो किंवा रेड कार्ड मिळालं नाही. अर्जेंटिनाच्या एकाच खेळाडूला दोनदा यलो कार्ड मिळाल्याने त्यांना अखेरच्या काही मिनिटात 10 खेळाडूंसह मैदानात खेळावं लागलं. याचाच फटका अर्जेंटिनाला बसला.
पेद्रो पोरोच्या क्रॉसवर फेरान टोरेसचा गोल
मॅचच्या 106 व्या मिनिटाला फेरान टोरेसने पेद्रो पोरोच्या क्रॉसवर आणि निको विल्यम्सच्या हेडर असिस्टवर पहिल्याच टचमध्ये अप्रतिम फिनिश करत निर्णायक गोल केला अन् स्पेनने पेनल्टी शुटआऊट टाळली. जर पेनल्टी शुटआऊटमध्ये गेम गेला असता तर अर्जेंटिना जिंकण्याची शक्यता होती. पण स्पेनने विजय मिळून 2010 नंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे.
Mumbai,Maharashtra
Spain vs Argentina : मार्टिनेझ भिंतीसारखा उभा होता, 106 व्या मिनिटाला एक चूक; मेस्सीच्या तोंडातून स्पेनने कसा हिसकावला वर्ल्ड कप?
