IND vs ENG: इंग्लंडला चोपल्याचं फळ मिळालं, मॅच जिंकताच अक्षर पटेलला मिळाली मोठी आनंदाची बातमी, असं काय घडलं? – Marathi News | Axar Patel Moved To Number 9 In Icc men Odi Rankings


भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडलसी जी भारतीय संघाने गमावली, आता वनडे मालिका खेळत आहे. पहिला वनडे सामना काल रंगला. जो भारतीय संघाने जिंकला. यामुळे या दोऱ्याची सुरुवात विजयी झाली आहे. या विजयात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या नंतर लगेचच एक दिवस उलटातच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसीने 15 जुलै रोजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली.

अक्षर पटेलने तीन स्थानांची झेप घेत आता आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत नववे स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाले, तरीही हे दोन्ही खेळाडू अव्वल पाचमध्ये कायम आहेत. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 52 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. 259 धावांचा पाठलाग करताना त्याच्या धावा निर्णायक ठरल्या. आपल्या प्रभावी फलंदाजीच्या कामगिरीपूर्वी, त्याने 9.5 षटकांच्या स्पेलमध्ये 62 धावांत 4 बळीही घेतले होते. या कामगिरीमुळे त्याला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत नववे स्थान मिळवण्यात मदत झाली आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा सर्वोच्च मानांकित अष्टपैलू खेळाडू बनला आहे. अक्षरकडे 213 रेटिंग गुण आहेत. अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई 316 गुणांसह यादीत अव्वल स्थानी आहे.

फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व आहे. कर्णधार शुभमन गिल 803 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने बर्मिंगहॅममध्ये 75 चेंडूंमध्ये 80 धावा केल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. रोहितला 21 चेंडूंमध्ये केवळ 11 धावा करता आल्या. दुसरीकडे, कोहली 6 चेंडूंमध्ये 5 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर LBW झाला.

एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, केवळ कुलदीप यादव पहिल्या 10 मध्ये आहे. तोही एक स्थान खाली घसरून आठव्या स्थानावर आला आहे. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला इंग्लंड संघाविरुद्धच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. भारतीय खेळाडूंमध्ये त्याच्यानंतर मोहम्मद सिराज आहे, जो 19 व्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह 24 व्या स्थानावर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *