Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात वेगवेगळे दावे केले जात आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून राज्यात वेगळ्या नेत्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा दावा केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा अनेकवेळा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील फडणवीस दिल्लीत गेले तर राज्यातील मुख्यमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळू शकते, असं भाकित केलं आहे. बावनकुळे हे सध्या राज्यात महसूलमंत्री आहेत. राऊत यांनी बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक केलेले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा राऊत आणि आमदार अंबादास दानवे हे पुन्हा एकदा बावनकुळे यांचे कौतुक करताना दिसले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या कौतुकाची एकच चर्चा रंगली आहे.
बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक
अंबादास दानवे आणि संजय राऊत सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. याच चर्चेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा विषय निघाला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक केले. बावनकुळे संवादात खूप चांगले आहेत ते कामाचा माणूस आहेत, असे राऊत आणि बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमी सकारात्मक असतात
तसेच, संजय राऊत म्हणाले की बावनकुळे हे नेहमी संवादात चांगले आहेत. राऊतांच्या या विधानावर सकारात्मकता दर्शवत विधिमंडळाच्या सभागृहातही चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमी सकारात्मक असतात. नकारात्मक भूमिकेतून ते कधी वागत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, ही बैठक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची होती. परंतु बैठकीत मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचीच चर्चा जास झाली. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे आगामी मुख्यमंत्री असू शकतात, असा दावा राऊतांनी केल्यानंतर बावनकुळे यांनी लगेच सोसळ मीडियावर स्पष्टीकरण दिले. आगामी काळातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे बावनकुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले. दरम्यान, राऊतांचे भाकित खरे ठरणार का? हे पाहणे महत्त्त्वाचे ठरणार आहे.