Last Updated:
या काळात कामांमध्ये वारंवार अडथळे येणे, विलंब होणे, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते, अशी धारणा आहे.
पुणे : साडेसातीचा काळ हा अनेकांच्या आयुष्यातील कठीण काळ मानला जातो. या काळात कामांमध्ये वारंवार अडथळे येणे, विलंब होणे, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते, अशी धारणा आहे. सध्या कोणत्या राशींवर साडेसातीचा प्रभाव सुरू आहे आणि या काळात कोणते उपाय केल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो, याविषयीची माहिती ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी दिली आहे.
तृप्ती भोसले यांनी सांगितले, सध्या मेष, कुंभ आणि मीन या तीन राशींवर साडेसातीचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितलं. भोसले यांच्या मते, मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असून खर्चात वाढ, मानसिक ताण, कुटुंबातील मतभेद आणि कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कुंभ राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने आरोग्य, काम आणि मानसिक ताणाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.
तर मीन राशीसाठी साडेसातीचा मधला टप्पा सुरू असून शनि सध्या मीन राशीत असल्याने मानसिक ताण, निर्णय घेण्यात गोंधळ, खर्चात वाढ, कामांमध्ये विलंब आणि वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नये, संयम राखावा आणि वाद-विवाद टाळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
हे करा उपाय..
साडेसातीच्या काळात प्रत्येक शनिवारी शनि देवांचे दर्शन घ्यावे. तसेच हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र यांचे पठण करावे. ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणेही लाभदायक मानले जाते, तसेच शनिवारी काळे तीळ किंवा अन्नाचे दान गरजूंना करावे. सात मुखी रुद्राक्ष धारण करणे आणि भैरवनाथांचे दर्शन घेणेही शुभ मानले जाते.
साडेसातीसाठी विशेष महत्त्वाचा उपाय म्हणजे छाया दान. यासाठी शनिवारी हनुमान मंदिरात तिळाचे तेल एका छोट्या ताटलीत घेऊन त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहावे आणि ते तेल मारुतीरायांच्या चरणी अर्पण करावे. हा उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे भोसले यांनी सांगितले.
Pune,Maharashtra