तुम्हालाही आरोग्याच्या बाबतीत ‘या’ समस्या सतावत असतील तर चुकूनही करू नका मखान्याचे सेवन – Marathi News | These 5 types of people should not eat makhana even by mistake otherwise they may face adverse effects


आजकाल मखाना हा सुपरफूड सध्या खूप लोक‍प्रिय झालेला आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते तसेच ग्लूटेन-फ्री असण्यासोबतच अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, ज्यामुळे मखाना हे एक आरोग्यदायी नाश्ता बनले आहे. मात्र प्रत्येक आरोग्यदायी खाद्यपदार्थाप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम ठरत असला तरी त्यात मखाना प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असं नाही. आरोग्य तज्ञांच्या मते मखान्याच्या अति किंवा नियमित सेवनामुळे काही लोकांमध्ये पचनाच्या समस्या, ॲलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून ज्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत काही समस्या सतावत असतील तर त्यांनी आपल्या आरोग्याच्या स्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात की कोणी मखाना खाणे टाळावे.

1. पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी मखाना खाणे टाळावे

मखान्यामध्ये जटिल कर्बोदके आणि फायबर असतात. ज्या लोकांना आधीपासूनच गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांनी् मखाना जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यांना अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः मसालेदार किंवा भाजलेला मखाना जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया आणखी मंदावू शकते.

2. कमी रक्तदाब असलेले लोकांनी मखान्याचे सेवन करणे टाळा

काही संशोधनानुसार मखाना रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो. तथापि ज्या लोकांचा रक्तदाब आधीच कमी आहे, त्यांनी सावधगिरी बाळगावी. जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्यास काही लोकांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे किंवा थकवा यांसारखी लक्षणे वाढू शकतात. जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल, तर नियमितपणे मखाना खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.

३. ज्यांना ॲलर्जीची समस्या सतावत असते त्यांनी मखाने खाऊ नये

मखान्यामुळे ॲलर्जी होणे दुर्मिळ असले तरी याच्या अती सेवनाने त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, मळमळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. जर तुम्ही पहिल्यांदाच मखाना खात असाल तर थोड्या प्रमाणात सुरुवात करा. जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जीची प्रतिक्रिया जाणवली, तर त्याचे सेवन ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. किडनीचा आजार असलेले लोकांनी सुद्धा मखाना टाळा

मखान्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. ही सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर आहेत, परंतु दीर्घकालीन किडनीचा आजार (CKD) असलेल्या रुग्णांना या खनिजांचे सेवन मर्यादित ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा रुग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय नियमितपणे मोठ्या प्रमाणात मखान्याचे सेवन करणे टाळावे.

5. ज्यांना मखान्याने वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी

मखाना हा कमी कॅलरी असलेला पदार्थ आहे, पण त्यात प्रथिने आणि आरोग्यदायी फॅटचे प्रमाण तुलनेने कमी असते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी फक्त मखान्याचे सेवन केले, तर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळणार नाहीत. शिवाय त्याचे अतिसेवन केल्याने गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे.

मखाना खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

मखाना नेहमी मर्यादित प्रमाणातच खा.

याला संतुलित आहाराचा भाग बनवा.

जर तुम्हाला कोणताही दीर्घकालीन आजार, कमी रक्तदाब, ॲलर्जी किंवा पचनाच्या समस्या असतील, तर नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोणत्याही खाद्यपदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *