ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 स्पर्धेचं वेळापत्रक बदललं, टी20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्याची घोषणा – Marathi News | ICC changes schedule of Womens Champions Trophy 2027 announces India Pakistan match in T20 World Cup 2028


ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 स्पर्धेचं वेळापत्रक बदललं, टी20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्याची घोषणाImage Credit source: ICC

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर आता मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बऱ्याच घडामोडी आयपीएल स्पर्धेदरम्यान घडल्या. यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वात एक बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यात महिला क्रिकेट संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यात पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत निर्णय घेण्यात आला. आयसीसीने मागच्या वर्षीच पुरूष क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफी महिला क्रिकेटमध्ये होईल याची घोषणा केली होती. यात आठ संघ भाग घेतील असंही स्पष्ट केलं होतं. या स्पर्धेसाठी जून आणि जुलैची तारीख निश्चित केली होती. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही स्पर्धा आता 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाईल.

भारत पाकिस्तान सामन्याबाबत घोषणा

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेची तयारीही आतापासून सुरू झाली आहे. कारण या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयने या बैठकीत या स्पर्धेबाबत आपलं म्हणणं आधीच स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ पाकिस्तान खेळणार नाही. भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीची ताणले गेले आहेत. पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडून टाकले आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तान खेळतच नाही. त्यामुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. भारतात झालेल्या महिला वनडे वर्ल्डकप आणि मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तान संघ आला नव्हता. त्यामुळे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. इतकंच काय तर भारतीय पाकिस्तानसोबतचा सामना श्रीलंकेतच खेळला होता.

आयसीसी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेला वुमन्स एमर्जिंग नेशन ट्रॉफी असं नाव देण्यात येणार आहे. आयसीसी या स्पर्धेत 10 संघांना सहभागी करणार आहे. 5 फुल मेंबर टीम, तर 5 असोसिएट मेंबर देशाचे संघ भाग घेतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *