1 जुलै रोजी देशातील विविध शहारतील सोन्याचे भाव किती ?
Gold Rate Today In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होऊन, सलोख्यासाठी जे वाढते प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे भू-राजकीय तणाव निवळण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा परिणा सोन्यावर झालेला दिसत असून सोन्याचे भाव वधारले आहेत; मात्र, औद्योगिक क्षेत्रातील मंद मागणीमुळे चांदीवर अजूनही दबाव कायम आहे. सोन्याचा विचार करायचा झाला तर एका दिवसाच्या घसरणीनंतर देशात ते महाग झालं आहे. गेल्या दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 120 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी, 29 जून रोजी 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 2020० रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरात 1850 रुपयांनी घट झाली होती. आजच्या बाबतीत सांगायचे तर, 24-कॅरेट आणि 22-कॅरेट अशा दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 10 रुपयांनी घट झाली आहे.
तर चांदीचा विचार करता, औद्योगिक क्षेत्रातील मंद मागणीचा या धातूवर दबाव निर्माण झाला असून त्यामुळे त्याची चमक ओसरली आहे. सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर, चांदीच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे; या दोन दिवसांत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची घट झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
देशातील 10 मोठ्या शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती त्यावरनजर टाकूया
तीन दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीही घसरली खाली
चांदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तीन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी या धातूच्या किमतीत घट झाली आहे. या तीन दिवसांच्या स्थिरतेपूर्वी, 26 जून रोजी चांदीच्या दरात प्रति किलो 5000 रुपयांची वाढ झाली होती, तर 25 जून रोजी त्यात 10,000रुपयांची घट झाली होती. आज दिल्लीत प्रति किलो दरात 100 रुपयांची घट होऊन एक किलो चांदीचा दर हा 2,34,900 रुपयांवर आला आहे. इतर प्रमुख महानगरांचा विचार करता, मुंबई आणि कोलकातामध्येही चांदी याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये प्रति किलो चांदी ही 2,44,900 या भावाने विकली जात आहे. म्हणजे या चारही शहरांपैकी चेन्नईत चांदी सर्वाधिक महाग आहे.