IND vs ENG: श्रेयसला बोलण्याची पद्धत नाही; कर्णधार होताच उर्मटपणा, वैभव सूर्यवंशीबद्दल केलं नको ते विधान – Marathi News | Shreyas iyer arrogant answer on vaibhav sooryavanshi debut against england 1st t20


भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाणार आहे. आता या मालिकेत तरी वैभव सूर्यवंशीला खेळवणार की नाही आसा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली. आयर्लंडविरुद्ध दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले नाही. आता आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर तरी इंग्लंडविरुद्ध मालिकेत वैभवला संधी मिळते असा प्रश्न कर्णधार श्रेय अय्यरला विचारण्यात आला. तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यरने जे उत्तर दिले ते पाहून चाहते आता कॅप्टनवरच भडकले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या सुरुवातीपूर्वी, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. श्रेयसला वैभव सूर्यवंशीबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, आणि त्याने नाराजीचे उत्तर दिले. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना, एका वरिष्ठ भारतीय पत्रकाराने त्याला वैभवच्या पदार्पणाबद्दल सोशल मीडियावर हवा आहे, ज्यावर अय्यरने उत्तर दिले की, मला नाही दिसली. कारण मी पाहिलेच नाही.”

चेस्टर-ले-स्ट्रीट टी-20 सामन्यापूर्वी, श्रेयस अय्यरला वैभवच्या पदार्पणाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, ‘मी काहीही पाहत नाही. मला माहीत नाही. मी तुमच्या बातम्या पाहत नाही. मी इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडिया पाहत नाही. मी काहीही ऐकले नाही.’ श्रेयस अय्यरचे हे स्पष्ट उत्तर चाहत्यांना आवडले नाही आणि त्यांनी त्याला अहंकारी म्हटले.

एका पत्रकाराने श्रेयस अय्यरला विचारले की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बेंचवर बसवणे कर्णधार म्हणून किती कठीण असते. यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, “मी टी-20 विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना एक योग्य संधी दिली पाहिजे. संघात खेळणाऱ्या प्रत्येकाने चांगली कामगिरी केली आहे. केवळ एकाच खेळाडूने चांगली कामगिरी केलेली नाही. आम्हाला प्रत्येकाला संधी द्यायची आहे, त्यांना ही खात्री द्यायची आहे की त्यांचे स्थान धोक्यात नाही. यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. ज्यांनी आम्हाला मागचा विश्वचषक जिंकण्यास मदत केली, त्यांना टी-20 कसा खेळला जातो याची कल्पना आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *