ENGW vs INDW 3rd T20i : इंग्लंड-इंडिया तिसरा आणि अंतिम सामना, फायनलला किती वाजता सुरुवात होणार? – Marathi News | Indw vs engw india against england women 3rd t20i match live and digital streaming know all details marathi news


इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरमनप्रीत कौर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चार्ली डीन हीच्या खांद्यावर इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा सामना मंगळवारी 2 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टाँटनमधील द कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

मालिकेत आतापर्यंत काय झालं?

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे चेम्सफोर्डमधील काउंटी ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं. भारताने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात हा सामना 38 धावांनी जिंकून विजयी सलामी दिली होती. पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र हरमनप्रीतने दुसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं. मात्र टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने करो या मरो सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आता सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *