मुंबई: सस्पेन्सचा जबदरस्त तडका असलेला ‘दृश्यम ३’ हा मल्याळम भाषेतील सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी जोरदार ओपनिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं मोठा गल्ला जमवला आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल याचा बहुप्रतीक्षित सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम ३‘ केव्हा प्रदर्शित होणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २१ मे रोजी मोहनलाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच ४० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे (शुक्रवार) बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
‘सॅकनिल्क’ च्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली, तरी जागतिक स्तरावर या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांतच तब्बल ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘दृश्यम ३’ नं गुरुवारी पहिल्या दिवशी भारतात १५.८५ कोटींची नेट कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी (वर्किंग डे असल्यामुळं) चित्रपटाच्या कमाईत जवळपास ३०% ची घट पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशीची ही कमाई १०.८५ कोटी इतकीच होती. तर भारतातील दोन दिवसांची कमाई ही २६.७० कोटींवर पोहोचली आहे. तर परदेशातही सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं बॉक्स ऑफिसवरचे आकडे लक्ष वेधणारे आहेत. सिनेमानं परदेशात दोन दिवसांत ४५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. त्यामुळं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्द बोलायचं झालं तर हा आकडा ७५ ते ७६ कोटींच्या घरात जात आहे.
या वर्षातील दुसरा सर्वात मोठा मल्याळम ओपनर जीतू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘दृश्यम ३’ हा यंदाच्या वर्षातील दुसरा सर्वात मोठा मल्याळम ओपनर ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर मोहनलाल आणि मल्याळम सुपरस्टार ममुटी यांचा काही दिवसांपूर्वी आलेला ‘पेट्रियट’ हा चित्रपट आहे.
चित्रपटाबद्दल बोलायचं झाल तर, ‘दृश्यम ३’ ची कथा ‘दृश्यम २’ जिथं संपली होती, तिथूनच पुढं जाते. चित्रपटात मोहनलाल पुन्हा एकदा आपल्या ‘जॉर्जकुट्टी’ या आयकॉनिक भूमिकेत दिसत असून, यावेळी तो एक फिल्म प्रोड्युसर बनला आहे. चित्रपटात त्याच्यासोबत मीना, आresidual सिनेमाज, अन्सबा हसन आणि एस्थर अनिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा