13,999 रुपयांचा नवा स्मार्टफोन, 12GB रॅमसह 5G सपोर्ट, फीचर्सही खास


मोटोरोलाने बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G37’ लाँच केला आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आलेल्या या फोनमध्ये 5G सपोर्ट, मोठी बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात व्हर्च्युअल रॅमसह एकूण 12GB पर्यंत रॅम मिळते. जाणून घ्या या फोनची किंमत आणि खास फीचर्स. चला तर मग जाणून घेऊया.

Moto G37। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्ही 15 हजारांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधत असाल, तर मोटोरोलाचा नवा Moto G37 उत्तम पर्याय ठरू शकतो. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीम, दमदार बॅटरी बॅकअप आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. ग्राहकांसाठी अत्यंत परवडणाऱ्या किंमतीत लाँच झालेल्या या मोटोरोला हँडसेटचे सविस्तर फीचर्स पुढे वाचा.

मोटोरोलाने भारतातील ग्राहकांसाठी Moto G37 लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या जी सीरिज लाइनअपचा एक भाग आहे, महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा हँडसेट मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी, अँड्रॉइड 16 सह लाँच करण्यात आला आहे. या फोनसाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील, या फोनची विक्री कधी सुरू होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फीचर्स आढळतील? चला जाणून घेऊया.

Moto G37 ची भारतातील किंमत

या फोनचा एक व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो, या व्हेरिएंटला 13999 रुपये खर्च करावे लागतील. या फोनची विक्री 25 मे पासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या साइटव्यतिरिक्त रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल. 25 मे पासून ग्राहकांसाठी या फोनची विक्री सुरू होणार आहे. या किंमतीत मोटोरोलाचा नवीन बजेट फोन रियलमी P4 लाइट 5G, सॅमसंग M06 5G, AI+ नोव्हा 2 5 आणि रियलमी नार्झो 100 लाइट 5G सारख्या स्मार्टफोनचा असेल.

Moto G37 चे स्पेसिफिकेशन

ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल-सिम (नॅनो आणि नॅनो) फोन अँड्रॉइड 16 वर काम करतो.

स्क्रीन:
हँडसेटमध्ये 6.6-इंच एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, टच सॅम्पलिंग रेट 120 हर्ट्ज, पीक ब्राइटनेस 1050 निट्स पर्यंत आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो.

प्रोसेसर:
या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6400 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने फोनला 12GB पर्यंत रॅमचा फायदा मिळतो, याशिवाय मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा:
फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-इन-1 लाइट सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिव्हिटी: फोन 5G, Wi-Fi 5, 4G LTE, ब्लूटूथ व्हर्जन 5.4, GPS, A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्टसह येतो. हा फोन देखील तुमच्यासाठी खास पर्याय ठरू शकतो.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा