Dilip Vengsarkar on BCCI : डोमेस्टिक क्रिकेट बंदच करा…! 10 सामन्यात 60 विकेट्स, तरीही टीम इंडियात जागा नाही, माजी भारतीय कर्णधार चवताळला, नेमकं काय म्हणाला?


Dilip Vengsarkar On Auqib Nabi : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करताच मोठा वाद पेटला आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये तब्बल 60 विकेट्स घेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाज आकिब नबीला संघात स्थान न मिळाल्याने माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर संतापले आहेत.

तीन खेळाडूंना वनडे संघात पहिल्यांदाच स्थान (Team India ODI Squad vs Afghanistan)

19 मे रोजी जाहीर झालेल्या संघात मानव सुथार, हर्ष दुबे आणि गुरनूर बराड यांसारख्या अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र रणजीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आकिब नबीकडे निवड समितीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

दिलीप वेंगसरकर संतापले (Dilip Vengsarkar On Auqib Nabi) 

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलीप वेंगसरकर यांनी निवडकर्त्यांवर जोरदार टीका केली. “आकिब नबीला दुर्लक्षित करणं म्हणजे पूर्णपणे हास्यास्पद आणि समजण्यापलीकडचं आहे. हा कसला संघ निवडण्याचा प्रकार आहे? हे अजिबात स्वीकारार्ह नाही. ही थेट अन्यायकारक गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

पुढे बोलताना त्यांनी आकिबच्या रणजीतील मेहनतीचा उल्लेख केला. “एका गोलंदाजाने रणजीत 60 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने सातत्याने संघासाठी सामने जिंकून दिले. अशा खेळाडूला संधी मिळाली नाही, तर मग देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अर्थ काय उरतो? जर डॉमेस्टिक क्रिकेटमधील कामगिरीला किंमत नसेल, तर बीसीसीआयने रणजी ट्रॉफीच बंद करावी,” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

आकिबच्या वेगाबाबतही वेंगसरकर यांनी स्पष्ट मत मांडले. “गोलंदाज 130 किमी प्रतितास वेगाने टाकतो की 145 ने, यापेक्षा तो विकेट्स घेतो का हे महत्त्वाचं असतं. आकिबने सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत. जेव्हा एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असतो, तेव्हाच त्याला संधी द्यायची असते. त्याचा आत्मविश्वास कमी होण्याची किंवा फिटनेस घसरण्याची वाट पाहायची नसते,” असे त्यांनी सांगितले.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ (Team India ODI Squad Vs Afghanistan)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

हे ही वाचा –

Vijay Shankar Retirement : 6 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर, IPL मध्येही कोणी विचारलं नाही… अखेर टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *