Dhurandhar 2 box Office Collection: अलिकडेच रणवीर सिंह (Ranveer Singh) विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2) या स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमानं 74 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 233 शोजमधून या सिनेमानं 74व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा 2 दिवसांत म्हणजे 4 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तरीही हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अजुनही सिनेमागृहात गर्दी करत आहेत. 11 व्या विकेंडमध्ये या सिनेमानं शानदार कमाई केली आहे
तर, दुसरीकडे अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 7व्या विकेंडमध्ये या सिनेमानं 2.45 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ‘चांद मेरा दिल’, ‘पती पत्नी और वो दो’ आणि ‘द ग्रेट ग्रँड सुपरहिरो’ यांसारखे नवीन चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असतानाही ही कमाई झाली आहे.
‘धुरंधर 2’ या सिनेमानं 74व्या दिवशी किती रुपयांचे कलेक्शन केले? (Dhurandhar 2 total worldwide box office collection)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या सिनेमानं 74व्या दिवशी केवळ 233 शोजमधून 20 लाख रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. ही रक्कम जरी कमी वाटत असली तरी, 11व्या विकेंडपर्यंत पोहोचूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे एका जादूई कामगिरीपेक्षा कमी नाही. 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने आतापर्यंत देशात 1,374.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले असून, 1,148.70 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.
तर, परदेशात या सिनेमानं 438 कोटी रुपयांची कमाई केली असून, त्याची जगभरातील एकूण कमाई 1,812.75 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा रिलीज होऊन एक महिना उलटला असून, अजूनही या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही. हा सिनेमा भारत आणि जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. 31 दिवसांत ‘राजा शिवाजी’ या सिनेमानं मराठी आणि हिंदी व्हर्जन मिळून एकूण 95.17 कोटी रुपये कमावले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
ABP माझाच्या बातम्या LIVE…
आणखी वाचा