Dhruv Jurel Century : वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष


Dhruv Jurel Century Ind Vs Sl 2nd Test : टीम इंडियाचा फलंदाज ध्रुव जुरेलने कोलंबो कसोटीत इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जुरेलने संयमी आणि दमदार शतक झळकावत आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे. ध्रुव जुरेलने 171 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. असिथा फर्नांडो गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. आपल्या शानदार खेळीत जुरेलने 9 चौकार लगावले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक झळकावण्याचा पराक्रमही त्याने केला. श्रीलंकेत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

धोनीलाही मागे टाकलं 

ध्रुव जुरेलच्या या विक्रमामुळे भारताचा माजी कर्णधार आणि महान विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मागे पडला आहे. यापूर्वी श्रीलंकेत भारतीय विकेटकीपर म्हणून सर्वाधिक मोठी कसोटी खेळी करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. 2010 मध्ये धोनीने श्रीलंकेविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. मात्र आता जुरेलने शतक ठोकत हा आकडा मोठ्या फरकाने मागे टाकला.

97 चेंडूत अर्धशतक, 171 चेंडूत शतक (Dhruv Jurel Century Ind Vs Sl 2nd Test)

जुरेलने 97 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्याने संयम सोडला नाही. श्रीलंकेचे गोलंदाज त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना जुरेलने खराब चेंडूची वाट पाहत धावा केल्या. शेवटी 171 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले आणि भारतीय क्रिकेटमध्ये आपले नाव इतिहासाच्या पानावर नोंदवले. त्याच्या या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता.

नव्या सेलिब्रेशनची चर्चा (Dhruv Jurel Century Celebration)

शतक होताच जुरेलने हवेत मुठ उंचावत आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याने हेल्मेट काढून मैदानातील आणि ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांकडून मिळणारा टाळ्यांचा कडकडाट स्वीकारला. दुसऱ्या बाजूला असलेल्या मोहम्मद सिराजनेही जल्लोष करत जुरेलला मिठी मारून या खास क्षणाचा आनंद साजरा केला. या शतक ठोकल्यानंतर जुरेलने आपल्या बायसेप्सवरील नवा टॅटूही दाखवला. त्याच्या नव्या सेलिब्रेशनमध्ये ‘जय जवान, जय किसान’ हा संदेश पाहायला मिळाला. त्यामुळे जुरेलचं हे शतक केवळ आकडेवारीपुरतं मर्यादित न राहता एका खास सेलिब्रेशनमुळेही चर्चेत आलं आहे.  

हे ही वाचा –

Ind Vs Sl 2nd Test : यशस्वी-फर्नांडो भिडले अन् ICCने घेतला कठोर निर्णय! दोघांवर मोठी कारवाई, मैदानातील राड्याने करिअरवर लागला डाग





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *