Shubman Gill : शुभमन गिलच्या नावावर सर्वात वेगवान द्विशतकाची नोंद, गिलनं ईशान किशन, रोहित शर्मा, सेहवागसह ग्लेन मॅक्सवेलचे विक्रम धडाधड मोडले…


गुवाहाटी: भारताचा कर्णधार शुभमन गिल यानं गुवाहाटीतील वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वनडेत द्विशतक झळकावलं. गिलनं नाबाद 233 धावा करत भारताच्या विजयाची पताका फडकावत वेस्ट इंडिज विरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना  7 बाद 405 धावा केल्या होत्या. भारतानं रोहित शर्माचं शतक आणि शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर हे आव्हान 8 विकेट राखून पार केलं. 

Shubman Gill : गिलचं द्विशतक, विक्रम धडाधड मोडले 

शुभमन गिलनं 117 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण करत ईशान किशन याचा विक्रम मोडला. ईशान किशन यानं 126 बॉलमध्ये बांगलादेश विरोधात द्विशतक केलं होतं. त्यानं ही खेळी बांगलादेशच्या चितगावमध्ये केली होती. आज  गिलनं त्याचा विक्रम मोडला. भारतानं वेस्ट इंडिजला 8 विकेटनं पराभूत केलं तेव्हा गिलनं नाबाद 133 बॉलमध्ये 233 धावा केल्या. गिलनं त्याच्या खेळीत 24 चौकर आणि 8 षटकार मारले. 

शुभमन गिल याने वनडे क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावलं आहे. हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरोधात गिलनं 2023 मध्ये 149 बॉलमध्ये 208 धावांची खेळी केली होती. 23 वर्ष आणि 132 दिवस एवढे वय असताना दोन द्विशतकं करणारा शुभमन गिल युवा फलंदाज ठरला आहे. 

शुभमन गिल प्रथम फलंदाजी करताना आणि धावांचा पाठलाग करताना द्विशतक करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानंतर शुभमन गिल हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतक करणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माच्या नावावर तीन द्विशतकं आहे.धावांचा पाठलाग करताना गिलच्या अगोदर ग्लेन मॅक्सवेल यानं देखील द्विशतक केलं आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात मॅक्सवेलनं द्विशतक केलंहोतं.  

शुभमन गिल याच्या नावावर धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील झाला आहे. गिलनं आज नाबाद 233 धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर होता. त्यानं 201 धावा केल्या होत्या. 

शुभमन गिल यानं कर्णधार म्हणून देखील सर्वात मोठी खेळी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल तिसरा कर्णधार आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता. रोहित शर्मानं 2017 नं नाबाद 208 धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवाग यानं 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरोधात 219 धावा केल्या होत्या. हा विक्रम देखील आता शुभमन गिलच्या नावावर झाला आहे. 

दरम्यान, भारतानं वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा वनडे सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *