Deool Band 3 Announcement: देऊळ बंद 2 बघायला गेले अन् थेटरमध्येच चाहत्यांना सरप्राईज; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद 3 ची घोषणा; राघव शास्त्रीला स्वामींचा फोन अन् .. VIDEO


Deool Band 3 Announcement: देऊळ बंद या सुपरहिट चित्रपटाने 2015 साली चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. तब्बल 11 वर्षांनी दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची ‘ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित सिक्वेलची प्रचंड चर्चा आहे. खरंतर, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत गुरुवारीच या चित्रपटाचे प्रदर्शन झालं. 6 वाजताच्या पहाटेच्या शोला प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः गर्दी केली होती. राज्यात अनेक ठिकाणी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतोय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.45 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  या सगळ्यात दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी ‘देऊळ बंद 3’ चित्रपटाची घोषणा केली. दुसऱ्या भागाच्या शेवटी स्वामी राघव शास्त्रीला कॉल करताना दिसतात आणि तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांना मोठा सरप्राईज मिळतं. सध्या सोशल मीडियावर देऊळ बंद 3च्या (Deool Band 3) घोषणेचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. 

पहिल्या भागात राघव शास्त्रीच्या एसी कारमधून श्रद्धा अंधश्रद्धेच्या कल्पनांना मोडीत काढत स्वामींनी राघव शास्त्रीच्या मनातून नास्तिकता बाहेर काढली होती. दुसऱ्या भागात स्वामी एका महिला शेतकऱ्याच्या दुचाकीवर स्वार झाले आहेत. आता दुसऱ्या भागाला चित्रपटगृहांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद’च्या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे. तिसरा भाग पुन्हा राघव शास्त्रीच्या आयुष्यात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे.

स्वामींचा राघव शास्त्रीला थेट कॉल अन्..

देऊळ बंद या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाराजांनी प्रमुख भूमिकेत होता.देऊळ बंदच्या दुसऱ्या भागात ही शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची एन्ट्री प्रेक्षकांना सुखद धक्का देते. चित्रपटातील राघव शास्त्रीच्या एन्ट्रीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याच क्लिपमध्ये देऊळ बंदच्या तिसऱ्या भागाची घोषणाही करण्यात आली आहे. 

या व्हिडिओमध्ये राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत काम करत असताना त्याला एक फोन येतो . दुसऱ्या बाजूने स्वामींचा आवाज ऐकून राघव शास्त्रीचा विश्वासच बसत नाही. स्वामी त्याला म्हणतात ‘ मी अक्कलकोट होऊन स्वामी समर्थ बोलतोय. तुला मी आठवतोय का? India@11 हे ऐकताच राघव शास्त्रीला मोठा धक्का बसतो. तो ‘ओह माय गॉड ‘ असं म्हणतो . त्यावर स्वामी म्हणतात ‘येस माय डार्लिंग,आय ॲम युवर गॉड. कसा आहेस सायंटिस्ट? काय म्हणते तुझी अमेरिका ? काय म्हणतो तुझा डोनाल्ड ट्रम्प ?’  यावर राघव शास्त्री म्हणतो ‘आज दहा वर्षांनी माझी कशी काय आठवण झाली ? ‘त्यावर स्वामी म्हणतात ‘तुझ्यासारख्या आणखी एका नास्तिकाला मार्गी लावून आलोय .तुझ्या मनातील नास्तिकता कमी नाही झाली ? असं विचारताच राघव शास्त्री म्हणतो ‘तुम्हाला माझ्या मनात किती आस्तिकता आहे हे पाहण्यासाठी यावच लागेल महाराज ‘जे बोलतात स्क्रीनवर देऊळ बंद 3 ची घोषणा होते. 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. तिसऱ्या चित्रपटाच्या घोषणेमुळे चाहते सुखावले आहेत. राघव शास्त्री आणि स्वामींना एकत्र पाहण्यासाठी ते प्रचंड उत्सुक दिसतात. या व्हिडिओवर नेटकरांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *