रात्रीतून घडलं असं काही… ट्विटरनंतर Instagram अकाऊंटही… Cockroach Janta Party चं अस्तित्वच धोक्यात? अभिजीत दिपके करणार काय? – Marathi News | Cockroach Janta Party After Twitter another blow to Abhijeet Deepke from hackers Instagram account hacked Who is so afraid of the new digital party


क्रॉकरोच जनता पार्टी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅकImage Credit source: एजन्सी

Cockroach Janta Party Abhijeet Deepke Instagram Account Hacked: क्रॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना हँकर्संनी अजून एक झटका दिला आहे. ट्विटरनंतर आता त्यांचे इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले आहे. त्यांनी एक्सवर इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यांनी Meta ला टॅग करत एक कमेंटही केली आहे. ‘मला इन्स्टाग्राम अकाऊंट ॲक्सेस करता येत नाहीये. हा ॲक्सेस संपला आहे. मी हे खातं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात अद्याप यश आलेले नाही.’ अशी कमेंट दीपके यांनी केली आहे. त्यावर मेटाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बॅकअप अकाऊंटही उडवले

तर एका दुसऱ्या पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी अजून एक माहिती दिली. त्यानुसार CJP चे बॅकअप इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहे. पार्टीच्या अधिकृत अकाऊंटवर 21 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. गुरुवारी क्रॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट भारतात सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळांनी ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने अजून एक ट्विटर हँडल तयार करण्यात आले.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा

अभिजीत दीपके यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आवाज उठवला आहे. माझी सोशल मीडियावरील खाती हॅक करण्यात येतील हे आम्हाला अगोदरच अपेक्षित होते. पण सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. आता आम्ही एक्सवर क्रॉकरोच इज बॅक या नावाने नवीन खाते सुरू केले आहे. खाते हॅक होत आहे, याप्रकरणात कायदेशीर प्रक्रिया करण्याचा इशाराही दीपके यांनी दिला. ‘कॉकरोच इज बॅक’ एक्स हँडल सुरू केल्यानंतर काही तासातच संध्याकाळी त्याच्या फॉलोअर्सची संख्या 39,000 हजाराहून अधिक झाली. या हँडलवरून पुन्हा एकदा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रेटण्यात आली.

कॉकरोच जनता पार्टी नावाने तीन वेगवेगळी ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्यात आली आहे. सध्या क्रॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया आणि हॅकर्सचा सामना करत असताना आणि अवघ्या काही तासात कोट्यवधींचे फॉलोअर्स मिळवत असतानाच कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात येत असल्याचे दिसते. काँग्रेस आणि भाजपला डिजिटल अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि फॉलोअर्स जमवण्यासाठी कित्येक वर्ष लागली. पण या पक्षाने काही दिवसातच रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स मिळवले. हा नवख्या पक्षाचा मोठा रेकॉर्ड मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *