CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?


CNG Price Hike Pune: गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चार झटके बसल्यानंतर आता राज्यात आणखी एक दरवाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी गॅसच्या दरात (CNG Gas Price) 2.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात प्रतिकिलो सीएनजीचा दर 94.85 रुपये इतका झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीलगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर सीएनजीचे हे नवे दर लागू झाले आहेत. याशिवाय, नाशिकमध्ये (Nashik) सीएनजीचा दर एक रुपयाने वाढला आहे. त्यामुळे आता पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) वाहनधारकांपाठोपाठ सीएनजी वाहनचालकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. सीएनजी हा किफायतशीर इंधनाचा पर्याय मानला जातो. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेकांनी सीएनजी वाहने वापरायला सुरुवात केली आहे. मात्र, महागाईच्या (Inflation) तडाख्यातून आता सीएनजीही सुटलेला नाही. त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांनाही दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. (Fuel Price hike)

सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपूट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते. 9 मे रोजी 1.50 रुपये वाढ झाली होती. मे महिन्यात ही दरवाढ दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सीएनजीचे दर वाढले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रातही सीएनजीचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. ही शक्यता आता खरी ठरली आहे. 

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढले आहेत. परिणामी इंधनाचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर  2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी येथे डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. 

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *