Last Updated:
माझी कुठलीही चूक नसताना मला ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास देत आहे. जर माझ्यावर काही कारवाई झाली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा विक्री करणाऱ्या एका गुन्हेगाराने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे आवारात विष प्राशन केलं. घटना लक्षात आल्यावर तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान या गांजा विक्रेत्याचा मृत्यू झाला. दिलीप यादव (वय ४४) असं मयताचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ व्हायरल झाला.
दिलीप यादवने या व्हिडीओमध्ये पोलिसांवर आरोप केला आहे. “माझी कुठलीही चूक नसताना मला ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास देत आहे. जर माझ्यावर काही कारवाई झाली, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पोलीस याला जबाबदार असतील, असं दिलीपने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
चार दिवसांपूर्वी शहरातील बाबूपेठ परिसरात गांजा विक्री प्रकरणी शहर पोलिसांनी धाड टाकली होती. या धाडीतील आरोपीने दिलीप यादव बाबत माहिती दिली होती. त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. मात्र आज शुक्रवारी दिलीप यादव हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने विष प्राशन केलं. पोलिसांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, मयत दिलीप यादवचा भाऊ अनुप यादव याने मात्र वसुलीच्या छळानंतर आत्महत्या केल्याचं सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
Chandrapur,Chandrapur,Maharashtra
Jul 17, 2026 10:29 PM IST
Chandrapur: ‘माझ्या जिवाला पोलीस जबाबदार’, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून दिलीपने उचललं टोकाचं पाऊल, चंद्रपूर हादरलं
