Manoj Jarange Patil : परळीवाल्याचे गुंड मस्तावले आहेत. त्यांच्यामुळं वाकडे कुटुंबीयांचे एक लेकरु गेलं आहे. तर दुसरा बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. वाकडेचा खून झाला दुसरा सुद्धा मेला पाहिजे या उद्देशाने पाठीमागे साक्षीदार राहिला नाही पाहिजे हा उद्देश तर नव्हता ना त्या पीएसआयचा परळी वाल्याचं ऐकूण असे जरांगे म्हणाले. निरीक्षकाला समजत नाही का की आपण प्रशासनामध्ये आहोत आरोपीची कसलीही कदर केली नाही पाहिजे असे ते म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पट्टीवडगाव येथे मृत ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली.
एका बांधवाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी रात्रभर पीआय गाडीत घेऊन फिरतो. पीएसआय 100 टक्के दोषी आहे. त्यांनी काळजी घेतली असती तर खून पण झाला नसता याच्यात दहा-पंधरा लोकांनी मारल्याचे जरांगे म्हणाले. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, कुटुंबियांना संरक्षण दिले पाहिजे, सरकारी वकील पण या कुटुंबीयांना देण्यात यावे असे जरांगे म्हणाले. कुटुंब आणि एसपी साहेबाला भेटून सगळ्या समस्या सांगितल्या पाहिजेत. फडणवीस साहेबाला एकच सांगायचे दहा चांगले सांभाळा गुंड सांभाळायचं बंद करा असे जरांगे म्हणाले. अजितदादांच्या पक्षाकडून धनंजय मुंडेला न्याय दिला जातो, परंतु तो तुमचा आशीर्वाद घेऊन खून करतो असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
फडणवीस तुम्ही जाणीव ठेवा अजितदादाच्या पक्षाने पण जाणीव ठेवली पाहिजे तो पदाचा दुरुपयोग खून करण्यात करतो, खून करण्यासाठी मंत्रिपद घेतात. बाकीचे मंत्री विकास करण्यासाठी मंत्रिपद घेतात. कुणी जीव घेण्यासाठी मंत्रिपद घेतो. जर पोलीस प्रशासन परळीचा एकूण तो खून असून अपघात दाखवत असतील आणि पीएम रिपोर्ट जर सांगत असेल हा खून आहे आणि तो पीआय म्हणत असेल की हा अपघात आहे, फडणवीस साहेब तुमची मान खाली घालण्याचा पोलीस प्रशासन करत आहे. तुमचं नाव बदनाम होईल असं परळी वाल्याचं ऐकूण करत असेल तर अजितदादाच्या पक्षांना आणि फडणवीस साहेबांनी बळ द्यायचं काम कमी करावे असे जरांगे पाटील म्हणाले. लोक सहन करतील तोपर्यंत करतील एके दिवशी खूप मोठा उद्रेक होईल, हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. पुढच्या काळात वाकडे कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे असे जरांगे म्हणाले.
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला