‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांच्या शर्यतीत आता ‘घबाडकुंड’; अवघ्या 3 दिवसांत कमावले इतके कोटी – Marathi News | Ghabadkund box office collection big budget marathi movie shashank shende sandip pathak devdatta nage
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर आता आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘घबाडकुंड’लाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडतोय….