उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.