पाळत ठेवली, एकट्या महिलेला घरात घुसून लुटलं; अज्ञाताने सोन्याच्या लोभात तिचा जीव घेतला, पनवेल हादरलं
Raigad Crime: पनवेलच्या कुंडेवहाळ गावात एका महिलेची सोन्याच्या लोभापायी हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या संगीता म्हात्रे यांचा गळा दाबून खून केला आणि लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कुंडेवहाळ गावात घडलेली हत्या आणि चोरीची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली…