Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले…


Atul Kulkarni on CJP Protest: नीट पेपर फुटी (NEET) प्रकरणाच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आज कॉकरोज जनता पार्टीकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज कॉकरोज जनता पार्टीच्या समर्थकांकडून संसद मार्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. हा मोर्चा जंतर – मंतर ते संसदेपर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाला खास दिग्गज कलाकार आणि नेते मंडळींची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान,  अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. यात लाखो जनता दिसत असून, त्यांनी यातून एक प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

नीट परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवरुन  गेल्या काही दिवसांपासून लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. त्यांच्याबरोबर काही लोक देखील उपोषणाला बसले होते.  सध्या त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज कॉकरोज जनता पार्टीकडून जतंर – मंतर ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतल कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

अतुल कुलकर्णींचा मोर्चातील व्हिडीओ व्हायरल (Atul Kulkarni on CJP Protest Video Viral)

 

दरम्यान, संसदेवरील या मोर्चासाठी कॉकरोच जनता पार्टीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे.   या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर  5000 हून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. आज तरीही लाखोच्या संख्येने लोक जंतर मंतरच्या दिशेने गेली आहेत. तरुणाईंचा हाच जल्लोष पाहून अतुल कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. 

यात हजारो लोक मोर्चाच्या दिशेनं जात असल्याचं दिसत आहे.  अतुल कुलकर्णी यांनी व्हिडीओ पोस्ट करत, ‘हजारो लोक संसद मोर्चात सहभागी होत आहेत,  तुम्ही देखील येत आहात का?’, असा प्रश्न त्यांनी आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला आहे.  सध्या अतुल कुलकर्णी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खास मोर्चाला पुनम पांडे, शबाना आझमी आणि प्रकाश राज यांची हजेरी पाहायला मिळाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *