Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळाली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा झालीय. बॉलिवूडमधील (Bollywood News) दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी अयोध्येत मोठी गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उभारणीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी अयोध्येला (Ayodhya News) आपली पसंती दिल्याचं आपल्या कानावर आलं असेलच. यात सर्वात मोठं नाव होतं, बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं. त्यांनी अयोध्येतील राम मंदीर उभारणीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात जमिनीचे मोठे भूखंड खरेदी केले असून, तेथील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ते समोर आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी रामनगरी अयोध्येत रातोंरात कोट्यवधींची जमिन खरेदी केलेली.
‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चे संस्थापक आणि सीएमडी (CMD) अभिनंदन लोढा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स इंडिया नेक्स्ट रिअल इस्टेट समिट 2026’ मध्ये ही माहिती दिली. रिअल इस्टेट गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून अयोध्येची वाढती लोकप्रियता यावर चर्चा करताना त्यांनी अनेक रंजक किस्सेही सांगितले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांना स्वतःहून फोन केला होता, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
‘बिग बी’ यांनी रात्री केलेला फोन (Big B Purchase Land In Ayodhya)
अभिनंदन लोढा यांनी 2023 मधील एका घटनेचा किस्सा सांगितला, जेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एक दिवस पहाटे 3 वाजता त्यांना एक फोन आला. त्या फोनपूर्वी त्यांना काही ‘मिस्ड कॉल्स’ आणि मेसेज आले होते, ज्यात म्हटलेलं, “मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या सोयीनुसार मला परत फोन करा…”
जेव्हा अभिनंदन यांनी ‘बिग बीं’ना परत फोन केला, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, “अभिनंदन-जी, मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायचीय…” अभिनेत्यानं सुरुवातीला किंमतीबद्दल विचारणा केली आणि अभिनंदन यांनी त्यांना सांगितलं की, 15,000 चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत 15 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्याच दिवशी 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हा व्यवहार पूर्ण झाला.
अयोध्येत जमीन खरेदी करण्यासाठी इच्छुकांची गर्दी (Ayodhya Ram Mandir)
लोढा यांनी नमूद केलं की, भारतातील मंदिर-शहरांच्या आसपास सांस्कृतिक पर्यटनाचा विकास होत असल्यानं, ही शहरं ज्येष्ठ नागरिकांच्या वस्त्यांसाठी पसंतीची ठिकाणं बनत आहेत. परिणामी, यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की, व्हॅटिकन सिटीमध्ये दरवर्षी सुमारे 1 कोटी पर्यटक येतात, तर अयोध्येत ही संख्या सुमारे 25 कोटी इतकी आहे.
स्वाभाविकच, पर्यटकांचा हा प्रचंड ओघ आर्थिक विकासाचा वेग वाढवतो. स्थानिक रहिवाशांना त्यांच्या जमिनी चांगल्या दरात विकण्याची संधी मिळते, ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळते. विशेष म्हणजे, अयोध्येत गुंतवणूक करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि ख्यातनाम चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :