मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्तवातील शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्यांवर आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईनंतर आता नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंनी मुसळधार पावसाच्या काळात मुंबईकरांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला होता, त्या मुद्यावरुन नगरसेवकांनी महापालिकेत आक्रमक व्हावं अशा सूचना दिल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील पक्षांच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी सूचना दिल्या.
मुंबईकरांचे प्रश्न प्रखरपणे मांडा : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्री निवासस्थानी मुंबई महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. मुंबई महापालिकेतील प्रश्न मांडा, प्रत्येक विभागातील समस्या महापालिका सभागृहात मांडाव्यात, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांसोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. मुंबई महापालिका क्षेत्रात मागील आठवड्याभरात अनेक घटना घडल्या आहेत. अनेक समस्या मुंबईकरांना जाणवत आहेत. मुंबईकरांचे हे प्रश्न प्रखरपणे सभागृहात आपल्या नगरसेवकांनी मांडावेत. मुंबईची जी अवस्था मागील आठवडाभरात झाली आहे, त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारावा…अशा प्रकारच्या सूचना आदित्य ठाकरेंनी नगरसेवकांच्या बैठकीत केल्याची माहिती आहे.
मुंबईत मुसळधार पावसाच्या दरम्यान चेंबूरमध्ये झाड स्कूल बसवर पडून एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तर, साकीनाका येथील खैरानी येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता . मुंबईत इतर ठिकाणी देखील झाडं पडल्यानं किंवा इमारत कोसळल्यानं मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. या सर्व मुद्यांवर पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक व्हावं, अशा सूचना आदित्य ठाकरेंनी नगरसेवकांना दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे, भास्कर जाधव विधानसभेत आक्रमक
विधानसभेत भास्कर जाधव यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तुम्ही सांगू नका, राम मंदिर लुटणारे तुम्ही, राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, नीट बोला… नीट बोला… तुमंच वय बघून बोला, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. तर, भास्कर जाधव यांनी अतुल भातखळकर भाजप सोडून मनसेत जाणार होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांना पक्षात घेतलं नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला.
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj