Rajgad Fort : आई फोनची वाट पाहत राहिली, तिथे 40 फूट खोल दरीत…; मुंबईतून राजगड पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी शेवट | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Accident News : नियती इतकी क्रूर कशी असू शकते? अवघ्या 25 व्या वर्षी एका हसत्या-खेळत्या तरुणावर काळाने असा काही झडप घातला की, त्याचे बोलणे शेवटचे ठरले. या एका बातमीमुळे सध्या संपूर्ण कुटुंबासह मित्रपरिवारावर न भरून निघणारे दुःख पसरले आहे.

पहाटे दोन वाजता घात झाला! राजगड ट्रेकसाठी निघालेल्या मिनीबसचा पाबे घाटात भीषण अपघात
पहाटे दोन वाजता घात झाला! राजगड ट्रेकसाठी निघालेल्या मिनीबसचा पाबे घाटात भीषण अपघात

मुंबई : आई मी रविवारी दुपारी फोन करेल आणि घरी जेवायला येणार की नाही ते सांगते…असं म्हणून घराबाहेर पडलेला तो तरुण पुन्हा घरी कधीच परत आला नाही. एका क्षणातच असं काही घडलं की, त्यानं ते वाक्या घरच्यांसाठी शेवटचं ठरलं.

नेमके घडले काय?

सुट्ट्याच्या दिवशी मित्रांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी मुंबईतून निघालेल्या एका तरुणांवर पाबे घाटात काळाने घाला घातला. पुण्यातील राजगड किल्ल्याकडे ट्रेकसाठी जात असलेल्या एका खासजी मिनीबसचा पाबे घाटा भीषण अपघात घडला होता. त्या अपघातात मुंबईच्या विलेपार्ले येथील नेहरुनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या 25 वर्षीय विश्वास सातिम या तरुणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही दुर्देवी घटना रविवारी पहाटे साधारण दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जिथं राजगडच्या दिशेने जाणारी ही मिनीबस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर आली असता अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटते आणि ही बस संरक्षक कठडा तोडून थेट 40 फूट खोल दरीत कोसळते.

दुर्देवी म्हणजे या भीषण अपघातात विश्वास सातिम सह अजून दोघांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात घडताच स्थानिक प्रशासन शिवाय नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मूळचा रायगड जिल्ह्यातील संदेरी गावचा असलेला हा तरुण अत्यंत मनमिळाऊ शिवास हसमुख स्वभावाचा होता. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. नोकरी सांभाळत विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. शनिवार-रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी तो सहकाऱ्यांसोबत राजगड ट्रेकसाठी निघाला होता.

घरच्यांना कधी समजली ही घटना?

घरातून बाहेर पडताना त्याने आईला विश्वासाने सांगितले होते की,रविवारी दुपारी फोन करुन जेवायला घरी येणार की नाही ते सांगेल. पण दुपारी फोन येण्याऐवजी पहाटे 3.30 मिनिटांनी त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता त्याच्या मृत्यूची बातमी घरी सांगण्यात आली. ही बातमी घरी समजताच सातिम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Rajgad Fort : आई फोनची वाट पाहत राहिली, तिथे 40 फूट खोल दरीत…; मुंबईतून राजगड पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी शेवट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *