बेलफास्ट : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. या विजयानंतर आयर्लंडचे मुख्य प्रशिक्षक हेनरिक मलान यांनी करार संपण्यापूर्वीच राजीनामा दिला. आयर्लंडनं भारतावर 2-0असा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीचा आनंद साजरा करत असतानाच मुख्य प्रशिक्षकांनी पदाचा राजीनामा दिल्यानं आयर्लंडला धक्का बसला आहे. कारण हेनरिक मलान यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला.
हेनरिक मलान यांचा करार 2027 च्या सुरुवातीपर्यंत होतं. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेतला. आयर्लंड क्रिकेट बोर्डानं आज ही घोषणा केली आहे. हेनरिक मलान यांंचं वय 45 वर्ष असून 2022 मध्ये ते मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यांनी चार वर्षांहून अधिक काळ संघासोबत काम केलं. मलान यांच्या मार्गदर्शनात सर्वात मोठं यश म्हणजे भारतावर टी 20 मालिकेत त्यांनी मिळवलेला विजय आहे. याशिवाय मलान यांच्या मार्गदर्शनात आयर्लंडचा संघ तीन वेळा टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. याशिवाय मलान यांच्या मार्गदर्शनात तीन कसोटी सामने देखील जिंकले.
हेनरिक मलान यांनी म्हटलं की या खेळाडूंसोबत, स्टाफ आणि आयरिश क्रिकेट समुदायासोबत काम करणं सन्मानाची बाब होती. इथं राहणं हा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी शानदार अनुभव होता. आयरिश क्रिकेटबरोबरचा वेळ प्रेमानं आठवणीत असेल, मलान यांनी म्हटलं.
आयर्लंडच्या संघानं केलेल्या दमदार कामगिरीसंदर्भातील आठवणी देखील हेनरिक मलान यांनी जागवल्या. ते म्हणाले की मैदानावर आम्ही अभिमानासह काही ऐतिहासिक सामन्यातील विजयांची आठवण काढू शकतो. मेलबर्नमध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात मिळवलेला ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानवर मिळवलेला कसोटी विजय, बेलफास्ट मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध जिंकलेली कसोटी मालिका, भारताविरोधात जिंकलेली टी 20 मालिका यांचा समावेश आहे.याशिवाय आयर्लंडनं पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. जगातील टॉप संघांना आव्हान देत त्यांना पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरणं हे आमचं मोठं यश असल्याचं देखील हेनरिक मलान म्हणाले.
आयर्लंडच्या टीमची 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी बांधणी करण्यासाठी नव्या प्रशिक्षकाला संधी मिळण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात आयर्लंडला वनडे वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये यश मिळवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. दरम्यान आयर्लंडला ऑगस्टमध्ये होणाऱ्या अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी प्रशिक्षक शोधावा लागेल.
█▓▒▒░░░BREAKING NEWS░░░▒▒▓█
Heinrich Malan to step down as Ireland Men’s head coach – read more: https://t.co/LmOtfd6F7d#BackingGreen #FailteSolar pic.twitter.com/Ny3H7tYEjB
— Cricket Ireland (@cricketireland) June 29, 2026
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला